Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Variety : सायाळ येथील युवा शेतकऱ्याकडून ज्वारीच्या देशी वाणाचे संगोपन

Jowar Farming : पूर्वीच्या काळात गावरान व दीर्घकाळ सारखाच उतारा देणारी पीक पद्धती असायची, मात्र आता संकरित वाण विकसित झाले आहे.

Team Agrowon

Nanded News : पूर्वीच्या काळात गावरान व दीर्घकाळ सारखाच उतारा देणारी पीक पद्धती असायची, मात्र आता संकरित वाण विकसित झाले आहे. हे वाण चार ते पाच वर्षे चांगला उतारा देते. मात्र त्यानंतर उतारा येत नाही.

या पार्श्‍वभूमीवर सायाळ येथील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला शेतकरी रत्नाकर ढगे यांनी तीन पिढ्यांपासून गावरान दगडी ज्वारी (गावरान) वाणाचे संगोपन केले आहे.

दर वर्षी शेतातील चांगले सुदृढ बियाणे धरून तेच बियाणे आपल्या शेतामध्ये ते पेरतात. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन जोमदार मिळते. त्यांनी उभ्या ज्वारीच्या एका कणसाचे वजन ५०० ग्रॅमच्या पुढे मिळते. बियाणे सुरक्षित राहावे म्हणून ते कणीस निवडून सुती पोत्यामध्ये ठेवले जाते.

आणि पेरणीच्या वेळी मळणी यंत्रामध्ये न टाकता हाताने बडवून बियाणे तयार केले जाते. त्यामुळे उगवण क्षमता जोमदार आणि चांगली होते, असे ते सांगतात. सुदृढ पीक असल्यामुळे उत्पादनही जोमदार मिळते. व्यवस्थित अंतर ठेवून पेरणी केल्यास १५ ते २० क्विंटल उत्पादन एकरी मिळते तसेच कडबाही चांगला मिळतो.

ज्वारीचा वापर दररोजच्या आहारामध्ये वाढल्यामुळे सध्या या ज्वारीला बाजारही चांगला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी देशी बियाण्यांचा वापर करून आपले उत्पादन व परंपरा जपाव्यात, असे आवाहन रत्नाकर ढगे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; राज्यात पावसाची उघडीप शक्य

Tanker Water Supply: पिके वाचविण्यासाठी टँकरने पाणी

Australian Agriculture: विस्तारणारी ऑस्ट्रेलियातील बाजारपेठ

Crop Damage Surveys: पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण सुरु, ३ लाख २७ हजार लाभार्थी शेतकरी

SCROLL FOR NEXT