Salam Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

Salam Kisan: शेतीविषयक हवं ते मिळतंय फक्त एका क्लिकवर

आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे ओळखणे शेतकऱ्यासाठी कठीण असते. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Team Agrowon

हल्ली शेतकरी बदलत्या हवामानामुळे (Climate Change) आणि पिकांवर होत असलेल्या रोग, किडींच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. हे कमी की काय म्हणून शेतमाल (Agriculture Produce) निघाल्यानंतर कुठल्या बाजारपेठेत कोणता भाव सुरू आहे, भाव कमी होणार की वाढणार, त्यामागची कारणं काय आहेत, याचीही माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना अनेक वेळा तोट्यात आपला माल विकावा लागतो.

आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे ओळखणे शेतकऱ्यासाठी कठीण असते. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकरी अधिकच्या खर्चात डुबला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे असते. तेही सोप्या शब्दांत.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी काय करता येईल, हा विचार धनश्री मानधनी या वीस वर्षीय तरुणीच्या मनात रूंजी घालू लागला.

त्या अमेरिकेत शिक्षण घेत असून भारतीय शेतीचाही अभ्यास करत आहेत. आपल्या शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने करून देण्याचे त्यांनी ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सलाम किसान हे सुपरअॅप शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींवर तोडगा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदे

‘सलाम किसान'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दररोज हवामानाचा अंदाज मिळेल. पीक दिनदर्शिकाद्वारे शेतकऱ्याला पिकांबद्दल लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

कमी वेळेत व कमी खर्चात मातीचे परीक्षण करता येईल. ड्रोनमुळे शेतात फवारणी करणे सोपे होईल. कीड व रोग शोधून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. शेतीबद्दल वेळोवेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेता येईल.

शेतकऱ्यांना बाजाराबद्दल तसेच दररोज बदलणाऱ्या बाजारभावाबद्दल माहिती मिळेल. शेतीमालाच्या वाहतुकीचा प्रश्न मिटेल. तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित घडामोडींची माहिती, बातम्या मिळतील.

सलाम किसान शॉपच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारी सर्व उत्पादने एकाच जागेवर उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना वित्तीय आधार मिळवून देण्यासाठी मदत उपलब्ध होईल. अशा प्रकारे ‘सलाम किसान'मुळे शेतकऱ्यांना शेती करताना फायदा होईल, असा कंपनीचा दावा आहे.

धनश्री मानधनी या ‘सलाम किसान'च्या संस्थापक आहेत. प्रद्युमन मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance: हवामानाधारित फळपीक विमा योजनेत परभणीतील १ हजार २१५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Solar Fencing Subsidy: सोलर फेन्सिंग अनुदानाचे आठ प्रस्ताव रखडले

Rural Economy: 'ग्रामीण अर्थव्यवस्थेत विविध कार्यकारी सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची'

Krishi Mahotsav: तुळजापूरमध्ये तुळजाभवानी जिल्हा कृषी महोत्सव

Agrowon Podcast: आल्याचा बाजारभाव स्थिर; सोयाबीनमध्ये नरमाई, कापसावरील दबाव कायम, काकडीला उठाव तर मका दबावाताच

SCROLL FOR NEXT