Soybean Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Disease : ‘येलो मोझॅक’, ‘मूळ-खोडकुजी’चा हजारो हेक्टरवर प्रादुर्भाव

Team Agrowon

Akola News : सोयाबीन पिकाला ‘येलो मोझॅक’, मूळकुज, खोडकुजीचा मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यात १५ ते १८ हजार तर बुलडाण्यात १९ ते २० हजार हेक्टरपर्यंत प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उत्पादन कमी होणार आहे. शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

त्यामुळे या जिल्ह्यांतही सर्वेक्षण होईल का, असा प्रश्‍न या भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’ हा विषाणूजन्य रोग आणि ‘खोडकुज’, ‘मूळकुज’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यानंतर हे सर्वेक्षण संबंधित नऊ जिल्ह्यांतच होईल की उर्वरित जिल्ह्यांसाठीही हे निर्देश लागू आहेत, याबाबत स्पष्टता नाही. याबाबत लेखी आदेशानंतरच यासंबंधीच्या सर्वेक्षणाबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

अकोला जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला ऑगस्टमधील पावसाच्या खंडाचा तडाखा बसला. त्यानंतर पावसामुळे रोगांनी घेरले. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यात या रोगांचा सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरीवरील पिकावर प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.

पिवळा मोजाक व इतर कीडरोगांमुळे सोयाबीन पिकात मुदती आधीच परिपक्वता आली. मात्र या झाडांवर लागलेल्या शेंगा वजनाने अत्यंत हलक्या आहेत. प्रत्येक दाणयाचे वजन चार ते पाच ग्रॅमने कमी झाल्याने उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.

पीकविम्यातून भरपाईबाबत पेच

पीकविम्याच्या निकषांत कीड-रोगामुळे नुकसान झाल्यास मोबदल्याची थेट तरतूद नाही. हा प्रकार ‘मीड सीझन’मध्ये बसतो. सध्या पीक अंतिम टप्प्यात आल्याने या ठिकाणी ‘मीड सीझन’ कसा लागेल हाही प्रश्‍नच आहे. परिणामी, पीकविम्यातून प्रादुर्भावग्रस्त पिकांच्या नुकसानाची भरपाई मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पावसाचा खंड पडल्यानंतर हलक्या जमिनीवरील सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक व इतर कीड-रोगांचा अधिक प्रादुर्भाव झाला. या शेतकऱ्यांचे उत्पादन कमालीचे घटेल. यासाठी तातडीने सर्वेक्षण करून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत.
- राजू वानखडे, अध्यक्ष, शेतकरी प्रगती मंडळ, मूर्तिजापूर, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

Sugar Industry : भारत-ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला

Food Industry Development: सरकारकडून अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक सुधारणा

Monsoon 2024 : मॉन्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय

Maharashtra Rain : विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT