Crop Protection  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection Drive : पीक संरक्षण मोहिमेअंतर्गत कीड, रोग नियंत्रण

Crop Pest Management : केव्हीके यवतमाळच्या कार्यक्षेत्रात यवतमाळ, कळंब, राळेगाव, घाटंजी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी जामणी, बाभूळगाव या ९ तालुक्‍यांचा समावेश आहे.

Team Agrowon

Yavatmal News : खरीप हंगामातील पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढता राहतो. ही बाब लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या यवतमाळ येथील केव्हीकेच्या तज्ज्ञांनी विशेष पीक संरक्षण मोहीम हाती घेतली आहे. केव्हीकेच्या कार्यक्षेत्रातील ९ तालुक्‍यांत हा उपक्रम राबविला जात असून त्याद्वारे पीक संरक्षणाचे धडे शेतकऱ्यांना दिले जात आहेत.

केव्हीके यवतमाळच्या कार्यक्षेत्रात यवतमाळ, कळंब, राळेगाव, घाटंजी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी जामणी, बाभूळगाव या ९ तालुक्‍यांचा समावेश आहे. दरवर्षी खरिपात कपाशीत गुलाबी बोंड अळी तर सोयाबीनवर येलो मोझॅक, पांढरी माशी व इतर कीड, रोगाचा प्रादुर्भाव होतो.

ही बाब लक्षात घेता केव्हीकेच्या तज्ज्ञांनी शुक्रवारपासून (ता. १) विशेष पीक संरक्षण मोहीमेवर भर दिला आहे. शेतकऱ्यांची तक्रार येताच त्या गावात जात कीटकशास्त्रज्ञांच्या माध्यमातून कीड निवारणाच्या उपायासंदर्भाने माहिती दिली जाते.

सध्या जिल्ह्याच्या बहुतांश भागात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधीक एक हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर हुमणीचे जैविक आणि रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसे करावे, या बाबत गावागावात जागृती केली जात असल्याची माहिती केव्हीकेचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी दिली.कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी असताना उपाययोजना केल्यास त्याचे परिणाम दिसून येतात.

प्रादुर्भाव वाढल्यास नियंत्रणाच्या मर्यादा येतात ही बाब लक्षात ठेवत शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजनांच्या माध्यमातून किडीचे नियंत्रण करीत पीक वाचवावे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसोबतच संबंधित नऊ तालुक्‍यांतील कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच त्या गावात कीड, रोग निवारणासंदर्भाने प्रबोधन केले जाते. यातून वेळीच किडीचे नियंत्रण शक्‍य होत असल्याने त्याचे व्यापक परिणाम साधले जात आहेत. गुलाबी बोंडअळी, हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता पाहता ही प्रतिबंधात्मक मोहीम सुरू आहे.
- डॉ. प्रमोद मगर, कीटकशास्त्रच, केव्हीके, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop in Crisis : विदर्भात पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात

Fishing Crisis : मत्स्यदुष्काळामुळे रोजंदारीच संकटात

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

SCROLL FOR NEXT