Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

Rainfall Deficit : जिल्ह्यात खरीप हंगाम पावसावर पिके तगली, गत महिन्यात १३ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे मान टाकलेली पिके पाणी देऊन जगवली.
Kharif Crop Loss
Kharif Crop LossAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगाम पावसावर पिके तगली, गत महिन्यात १३ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे मान टाकलेली पिके पाणी देऊन जगवली. मुळात, अति पाऊस आणि काही प्रमाणात पावसाचा खंड या दोन्हीचा फटका खरिपातील पिकांना बसला आहे.

त्याच बदलत्या वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भावही होऊ लागला आहे. या साऱ्यामुळे उत्पादनात घट होईल, असा अंदाजही व्यक्त होऊ लागला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात खरिपाचा पेरा २ लाख २७ हजार ३८६ हेक्टर म्हणजे ९२ टक्के झाला आहे. मुळात सततच्या पावसामुळे पेरण्या रखडल्या होत्या. त्यातच क्षेत्र कमी होईल, असाही अंदाज होता. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक टक्का क्षेत्र घटले आहे. जूनमध्ये १४८.२ मिलिमीटर पाऊस झाला.

या सततच्या पावसामुळे पाणी साचून राहिल्याने पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात तूर, मूग, उडीद पिकास पोषक वातावरण असले, तरी पावसाचा खंड होताच. त्यामुळे या पिकांनाही काही अंशी फटका बसला असल्याचे चित्र आहे.

Kharif Crop Loss
Crop In Crisis : पावसाने आठवडाभर दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

जिल्ह्यात जुलैमध्ये १८ दिवसांत ११७.३ मिलिमीटर म्हणजे ८६ टक्के पाऊस झाला. इस्लामपूर, शिराळा, मिरज या तालुक्यांत अपेक्षित पाऊस झाला. तर जत, आटपाडी दोन तालुक्यांत अवघा पाच दिवस पाऊस पडला. कवठेमहांकाळ तालुक्यात १२ दिवस पाऊस झाला. ऐन पीक वाढीचा काळ, फुलोरावस्थेचा काळ या दरम्यान पावसाचा खंड पडला आहे.

यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागात हंगाम वाया जाण्याची भीतीही निर्माण झाली होती. अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी पिके पाणी देऊन जगवली आहेत. जुलैमधील पहिल्या आठवड्यात १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Kharif Crop Loss
Crop In Crisis : पावसाच्या उघडिपीमुळे पिकांनी टाकल्या माना

वास्तविक, बुधवारी (ता. ६) जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील आटपाडी, जत या दोन तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला. तर इतर तालुक्यांत कमीअधिक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पुढे काय होणार, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

कृषी विभागाची निरीक्षणे

मका ः पीक उगवण अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे पीक पिवळे पडले असून शिराळा तालुक्यात अल्प प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

उडीद ः पिकावर मावा किडीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे.

सोयाबीन ः पाने खाणारी अळी व खोड किडीचा प्रादुर्भाव आहे.

तूर ः पीक वाढीच्या अवस्थेत असून शेंडा मारण्याचे काम सुरू आहे.

मूग ः अनेक ठिकाणी फूल कळीची अवस्था आहे.

पावसाच्या खंडामुळे पिकांची परिस्थिती बिकट झाली असून पाणी देऊन पिके जगवली आहेत. परंतु बदलत्या वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
- रमेश जाधव, येलूर, ता. वाळवा
सलग पाऊस असल्याने सोयाबीनच्या पेरण्या उशिरा झाल्याने सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. सांगलीचा पूर्व भागात पिकांची उगवण चांगली झाली आहे. परंतु पीक वाढीच्या काळातच पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे सोयाबीनसह मूग, उडीद या पिकांसह अन्य पिकांच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज आहे.
- डॉ. श्रीमंत राठोड, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, कसबेडिग्रज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com