Dhangar Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Dhangar Reservation: आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार! मुंबईत धनगरांचा मोर्चा दाखल

Dhangar Samaj Morcha Mumbai : आरक्षणासाठी धनगर समाजाने एल्गार पुकारला आहे. तर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह धनगर समाज मुंबईत धडकला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाल्याचे समोर आले आहे. धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेकडून मंत्रालय आणि विधानभवनावर घेराव घालण्यासाठी एल्गार करण्यात आला आहे. तर धनगर समाजाचा १ हजारहून अधिक गाड्यांचा ताफा मुंबईत धडकला आहे. यावेळी पोलिसांनी हा ताफा अडवल्याने यशवंत सेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक दिसून आले. तसेच त्यांच्याकडून रस्त्यावर बसून घोषणा देण्यात आल्या.

धनगर समाजाने आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केली आहे. तसेच धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचे हजारो कार्यकर्ते आणि १ हजारहून अधिक गाड्यांच्या ताफा मुंबईत दाखल झाला आहे. यावेळी यशवंत सेनेकडून आरक्षणासाठी मंत्रालय आणि विधानभवनावर घेराव घालण्याची तयारी केली जात आहे. 'सात दिवसांच्या आधी आम्हाला आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसण्याची परवानगी देण्यात आली होती. पण आता अडवले जात असल्याचे', धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी म्हटले आहे. 

'राज्य सरकराने ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्याच धरतीवर धनगर समाजाला आरक्षण द्यावे', अशी मागणी यशवंत सेनेच्या दोडतले यांनी केली आहे.  तसेच त्यांनी, 'मराठा समाजाबरोबरच धनगर समाज ही आंदोलनावर बसला होता.

त्यावेळी तीन महिन्यांची मुदत सरकारने मागून घेतली. राज्य सरकारने धनगर समाजाकडून घेतलेली मुदत आता संपणार आहे. त्यामुळे याच सुरू असणाऱ्या अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील दोडतले यांनी केली आहे.

पोलिसांनी अडवला गाड्यांचा ताफा 

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या १ हजारहून अधिक गाड्यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी तो आडवला. पोलिसांनी पी डिमेलो रोडवर गाड्यांचा ताफा अडवला. याआधी धनगर समाजाच्या आरणक्षासाठी मुंबईच्या दिशेने धनगर समाज रवाना होईल असे दोडतले यांनी स्पष्ट केले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT