Dhangar Reservation : सुरेश बंडगरांनी जलत्याग केल्याने प्रकृती खालावली ; शासन निर्णयावर ठाम

Suresh Bandgar Fasting : धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या सुरेश बंडगर यांच्या उपोषणाचा आज १७ दिवस आहे. शासन निर्णय जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे न करण्याचा निर्णय घेत त्यांनी जलत्याग केला. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.
Suresh Bandgar Fasting
Suresh Bandgar FastingAgrowon
Published on
Updated on

Dhangar Community Reservation : धनगर समाजाचं आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यात चौडी येथे यशवंत सेनेच्या अण्णासाहेब रुपनर आणि सुरेश बंडगर यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाचा आज १७ दिवस असून त्यांना राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या प्रश्नावर काल मुंबईत सरकारच्यावतीने बैठक घेण्यात आली. परंतु, तोडगा न निघाल्याने आंदोलक शासन निर्णयाच्या मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी कालपासून जलत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.

Suresh Bandgar Fasting
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर सह्याद्रीवरील बैठक निष्फळ ; सरकारने मागितली दोन महिन्यांची मुदत

धनगर आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सकारात्मक बैठक झाली. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, तसेच आ. गोपीचंद पडळकर, राम शिंदे, दत्तात्रय भरणे व इतर धनगर समाजातील नेते उपस्थित होते. या बैठकीत सरकारच्यावतीने आरक्षणासंदर्भात निर्णय चार राज्यांमधील आरक्षण पध्दतीचा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे आंदोलकांची नाराजी कायम असून ते आंदोलनावर ठाम आहेत.

चौंडी येथे सुरेश बंडगर यांचे आजही उपोषण सुरू आहे. कालपासून सलाईन लावणं बंद केलं आहे. पाण्याचाही त्याग केला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी मी कोणताही उपचार घेणार नाही. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे सुरेश बंडगर यांनी जाहीर केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com