Tesai Devi Yatra
Tesai Devi Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Tesai Devi Yatra : तिसाई देवी यात्रेत रंगले कुस्त्यांचे सामने

Team Agrowon

Kalyan News : आगरी कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कल्याण पूर्व तिसगावमधील जरिमरी तिसाई देवीची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेत भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती.

यात मुख्य आकर्षण होते ते कुस्ती सामन्यांचे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेती वैष्णवी पाटील हिचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावर्षी गुरुवारपासून (ता. ६) याची सुरुवात झाली. गुरुवारी रात्री पालखी सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी देवीचा अभिषेक आणि पूजा करण्यात आली. देवीच्या गाभाऱ्यात सजावट केल्यानंतर सकाळी साडे नऊनंतर दर्शनाला सुरुवात झाली होती.

दुपारी कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले होते. यात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेती वैष्णवी पाटील हिचा रामदास ढोणे आणि नवीन गवळी यांनी ५० हजार रुपये रोख आणि गदा देऊन सत्कार केला.

दरम्यान कुस्त्यांच्या सामन्यात ८० हून अधिक लहानमोठ्या कुस्त्या झाल्या. कुस्तीच्या सामन्यांचे आयोजन तिसाई क्रीडा मंडळाकडून करण्यात आले होते.

या वेळी जरीमरी सेवा मंडळाचे संचालक भगवान भोईर, अध्यक्ष दत्ता गायकवाड, सचिव नरेंद्र सुर्यवंशी, अभिमन्यू गायकवाड, महेश गायकवाड, सुनिल गायकवाड, किशोर गायकवाड, ज्ञानदेव भोईर, अनिल घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT