Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या हस्ते आज कामगारांना मिळणार घरे

Distribution of Houses : सोलापुरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कुंभारी येथील रे नगरे येथे उभारण्यात आलेल्या सुमारे ३० हजार घरांपैकी १५ हजार घरांचे आज (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामगारांना वितरण होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापुरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कुंभारी येथील रे नगरे येथे उभारण्यात आलेल्या सुमारे ३० हजार घरांपैकी १५ हजार घरांचे आज (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामगारांना वितरण होणार आहे. सोलापुरातील कामगारांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रसंग असणार आहे.

कुंभारी येथे आज सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान मोदी यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते रे नगरातील पाच प्रातिनिधीक लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चावीचे वितरण आणि या वसाहतीचा लोकार्पण सोहळा होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम आदी उपस्थित राहतील. सुमारे ३५० एकरांवर हा भव्य प्रकल्प साकारला जात आहे.

या परिसरात ८३४ इमारती उभारण्यात येत आहेत. एका इमारतीत ‘वन बीएचके’चे ३६ फ्लॅट असतील. या शिवाय या परिसरात क्रीडांगण, योगासन सेंटर असेल.

शरद पवार यांचाही मंगळवेढ्यात कार्यक्रम

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मंगळवेढ्यात दुपारी दीड वाजता सेंद्रिय शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेला उपस्थित राहतील. एकाचवेळी दोन नेते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT