PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर

Distribution of Houses : पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण शुक्रवारी (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
PM Modi
PM ModiAgrowon
Published on
Updated on

Solapur News : कुंभारी येथील रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलाचा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण शुक्रवारी (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर या गृहप्रकल्पातील कामाचा तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. १४) घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल तेली-उगले, शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,

मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, रे नगर फेडरेशनचे प्रवर्तक, माजी आमदार नरसय्या आडम, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, रेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख उपस्थित होते.

PM Modi
PM Narendra Modi : प्रत्येकाने ‘श्रीअन्नाचे’ ब्रॅण्ड ॲम्बेसिडर व्हावे : मोदी

पालकमंत्री पाटील म्हणाले, हा गृह प्रकल्प जगातील सर्वात मोठा गृह प्रकल्प असून, यातून तीस हजार कुटुंबाच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या घरकुल वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी.

PM Modi
Food Inflation : केंद्र सरकार महागाई रोखण्यासाठी गव्हाची करणार विक्री

कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी व नागरिक यांना ने -आण करण्यासाठी रे नगर फेडरेशन यांनी योग्य नियोजन करावे. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.

घरकुल वितरणाचा कार्यक्रम शांततेत पार पडेल, यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व रे नगर प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी पार पडेल, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांना सूचित केले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. तसेच कार्यक्रमासाठी तयार करण्यात येत असलेल्या सभा ठिकाणाचीही पाहणी करून व्यासपीठ तसेच किती नागरिक सभामंडपात बसू शकतात या अनुषंगाने माहिती घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com