Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : कृषी विद्यापीठात काम बंद

जुन्या पेन्शनधारक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

Team Agrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Agricultural University) काही कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. १४) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ४५२० पदे मंजूर असून, त्यांतील २३४९ पदे भरलेली आहेत. त्यांपैकी १४५० कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही. यामुळे विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन, विस्तार, प्रशासन आणि विकासकामे ठप्प झाली आहेत.

कृषी सहायक संघटना, लिपिकवर्गीय संघटना, मागासवर्गीय सेवक संघटना, प्राध्यापक संघटना, असे सर्व कर्मचारी मध्यवर्ती समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली, जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी काम बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी झालेले आहेत.

कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव व राहुरीच्या तहसीलदारांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Muncipal Election Result: पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा ’

Bee Conservation: मधमाशी पालनातून निसर्गाशी नाते जोडण्याचा उपक्रम प्रशंसनीय

ISMA President: ‘इस्मा’च्या अध्यक्षपदी नीरज शिरगावकर

Pigeon Pea Variety: कोरडवाहू शेतीसाठी ‘गेमचेंजर’ ठरणार तुरीचा १२० दिवसांत येणारा वाण

Jaggery Market: सांगली बाजार समितीत नव्या गुळाची आवक

SCROLL FOR NEXT