Bajari Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Crop : बाजरीत आंतरमशागतीस वेग

Inter Cultivation Work : खानदेशात बाजरीची पेरणी यंदा स्थिर आहे. पीक अनेक भागांत निसवले असून, त्यात आंतरमशागतीस वेग आला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीची पेरणी यंदा स्थिर आहे. पीक अनेक भागांत निसवले असून, त्यात आंतरमशागतीस वेग आला आहे. मध्यंतरी प्रतिकूल, पावसाळी वातावरणात पिकात अळ्यांची समस्याही तयार झाली होती. ही समस्या आता आटोक्यात दिसत आहे.

बाजरीची पेरणी खानदेशात यंदा वाढेल, असे संकेत होते. बाजरीची पेरणी धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव या भागांत बऱ्यापैकी केली जाते.

परंतु या भागात जलसाठे कमी आहेत. कारण पाऊसमान हवे तसे नव्हते. साक्रीतील बुराई, शिंदखेड्यातील लहान-मोठे प्रकल्प कोरडे आहेत. गिरणा पट्ट्यात गिरणा धरणातून यंदा रब्बीसाठी पाणी मिळालेले नाही. यामुळे या भागातही अडचणी आहेत. परिणामी बाजरीची पेरणी वाढली नाही.

तापीकाठी पसंती

तापी, अनेर नदीकाठी अनेक शेतकरी बेवड म्हणून बाजरीची पेरणी करतात. खानदेशात मुक्ताईनगर, जळगाव, यावल, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली. यामुळे क्षेत्र सुमारे साडेसहा हजार हेक्टरवर स्थिर राहिले आहे. अनेकांनी केळी पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर त्यात पूर्वमशागत करून ठिबकवर बाजरीची पेरणी केली.

पेरणी जानेवारीच्या मध्यात व अखेरीस झाली. जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात पेरणी केलेले बाजरी पीक निसवले आहे. त्यात अद्याप दाणे पक्व होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्यंतरी किंवा २६ फेब्रुवारी ते १ मार्च याकालावधीत खानदेशात गारपीट, वादळी पाऊस झाला. यामुळे पिकात तण वाढले. काही भागात पीक वाकले होते. ते स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाने सरळ झाले आहे. त्यात तणनियंत्रणाचे काम सुरू आहे. तसेच खतेही दोन वेळेस शेतकऱ्यांनी दिली आहेत.

खते देण्याची कार्यवाही काही भागात पूर्ण झाली आहे. ढगाळ वातावरण, पाऊस, गारपीट यामुळे पिकात काही भागांत अळ्यांची समस्या तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना फवारणी घ्यावी लागली. त्यावर खर्च करावा लागला. बाजरी कमी कालावधीचे पीक असल्याने त्याची मळणी खानदेशात एप्रिलमध्ये गती घेईल. पीकस्थिती बऱ्यापैकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT