Devna Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Devna Irrigation Project : लालफितीत अडकले ‘देवनाचा’ प्रकल्पाचे काम

Irrigation Project : अवर्षणप्रवण पूर्वभागाला जलसंजीवनी देऊ शकणाऱ्या देवदरी येथील प्रस्तावित देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम लालफितीच्या कारभारात अडकले आहे.

Team Agrowon

Nashik News : अवर्षणप्रवण पूर्वभागाला जलसंजीवनी देऊ शकणाऱ्या देवदरी येथील प्रस्तावित देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम लालफितीच्या कारभारात अडकले आहे. या प्रकल्पाला २० जानेवारी २०२१ ला प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी केवळ निविदा प्रक्रिया राबविण्यास २ वर्षे लागली आहेत.

सर्व संबंधित खात्यांची मंत्रालयात संयुक्त बैठकीत ‘एक खिडकी’च्या धर्तीवर निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी जलहक्क संघर्ष समितीने भारम येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या जनता दरबारात केली आहे.

२० जानेवारी २०१४ ला जलविज्ञान संस्थेच्या या प्रकल्पासाठी ६५ दशलक्ष घनफूट (१८४० सहस्र घनमीटर) क्षमतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. सविस्तर प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता मिळून राज्य शासनाची १२ कोटी ७७ लाख ३६ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यतादेखील जानेवारी २०२१ मध्ये मिळाली आहे.

त्यानंतर मात्र नुसती निविदा प्रक्रिया राबविण्यास २ वर्षे लागली. प्रकल्पासमोरील अडचणी सोडविण्यासाठी संबंधित कॅबिनेट मंत्री, प्रधान सचिव, विभाग प्रमुख व केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाशी संबंधित विभाग प्रमुखांची संयुक्त बैठक घ्यावी आणि ‘एक खिडकी’ योजनेसारखी सर्व अडचणी एकाच बैठकीत मार्गी लावाव्यात, अशी मागणी समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे.

या वेळी देण्यात आलेल्या निवेदनावर कृती समितीचे सचिव जगन मोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह तब्बल ९०० शेतकऱ्यांच्या सह्या व अंगठे आहेत.

या प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावांमधील प्रत्यक्ष ३५८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून, अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, रेंडाळे या शिवारातील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

कायमच अवर्षणग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जलसंजीवनी मिळणार असून, तालुक्यातील हा सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे. हा राज्यस्तरीय प्रकल्प असून, २०१२ नंतरच्या सर्व जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषी, वने, पर्यावरण विभागांतर्गत येणाऱ्या विविध विभागांतून हा विषय गेला आहे.

यापुढेही या विविध खात्यांत संयुक्त समन्वय साधून प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे.

खात्यांचे मुख्य सचिव, प्रधान मुख्य वन संरक्षक आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे मंत्री व सचिव यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी या वेळी डॉ. पवार यांच्याकडे करण्यात आली.

असा आहे देवनाचा प्रकल्प

एकूण खर्च मान्यता - १२ कोटी ७७ लाख ३६ हजार १५३

लाभार्थी गावे- राहाडी, खरवंडी, देवदरी

सिंचन क्षमता - ३५८ हेक्टर

उपलब्ध होणारे पाणी- ६५.३३ दशलक्ष घनफूट

धरणाची लांबी - २२५ मीटर

धरणाची उंची - १६.१८ मीटर

सांडव्याची लांबी- ९० मीटर

बुडीत क्षेत्र - ५७ हेक्टर

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आजवर अनेक उग्र आंदोलने केली. मात्र प्रत्येक विभागाकडे स्वतंत्र पाठपुरावा करण्यात शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. समृद्धी महामार्गासारख्या महाकाय प्रकल्पांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी मिळतात. मात्र, शेतकऱ्यांची मागणी असलेल्या विषयांवर सरकार सोईस्करपणे दुर्लक्ष करते. देवनाचा प्रकल्पासाठी ‘एक खिडकी’ योजना राबवून प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा.
भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT