Water Demand Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

Demand for Water : नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील जलद गती कालव्याला आवर्तन सोडण्यासाठी महिला पाण्याचा हंडा घेऊन उपोषण करत आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील जलद गती कालव्याला आवर्तन सोडण्यासाठी उपोषण सुरू असताना शेकडो महिला पाण्याचा हंडा घेऊन तर पाठीमागे पुरुष शेतकरी जोरदार घोषणाबाजी करत मंगळवारी (ता. ७) वैजापूर सिंचन विभागाच्या कार्यालयावर धडकले.

‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ आदी घोषणांनी शेतकऱ्यांनी सिंचन विभाग कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. आवर्तनासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण मंगळवारीही दुपारपर्यंत सुरूच होते. प्रशासन बैठकांत व्यस्त मात्र निर्णय होत नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.

वैजापूर व गंगापूर तालुक्यातून जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतर्फे पाणी आवर्तनासाठी शुक्रवारी (ता. ३) वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळपर्यंत मागणी मान्य न झाल्याने या मोर्चाचे रूपांतर उपोषणात करण्यात आले. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक झाली, निर्णय मात्र झाला नाही.

निर्णय झाला की कळवतो असे उत्तर मोर्चेकऱ्यांना मिळाले. सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्याने आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात करण्यात आले. सोन्याबापू शिरसाट, रामचंद्र पिल्दे, योगेश तारू, सचिन गायकवाड, मंदाताई न्हावले आदी उपोषणात सहभागी झाले.

सावखेडगंगा येथील ग्रामपंचायतीने जलद गती कालव्याला आवर्तन सोडल्यास १३ मे रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला. असेच ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायती संख्या आता वाढू लागली आहे. शिवाय मंगळवारी अनेक ठिकाणच्या महिला व पुरुष शेतकरी उपोषणकर्त्यांसह वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

दुष्काळी स्थितीत नियमाप्रमाणे नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून गंगापूर, वैजापूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे गरजेचे होते. या विषयी वेळोवेळी पाठपुरावा करूनही उन्हाळी आवर्तन सोडले नाही. त्यामुळे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Coriander Intercropping: उसातील कोथिंबिरीची नियोजनबद्ध शेती

Smart Farming: ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान त्रिसूत्रीचा आदर्श : विक्रम गायकवाड

Women Farmers Empowerment Bill: कागदी ओळख की हक्कांची लढाई?

Onion Procurement Irregularities: सडके कांदे दूर करा

Onion Procurement Irregularities: केंद्राच्या कांदा खरेदीत अधिकारी-दलालांच्या संगनमताचा आरोप

SCROLL FOR NEXT