Dilip Swami Agrowon
ॲग्रो विशेष

Voting Awareness : मतदान, मतदार जागृतीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा

Dilip Swami : ‘‘मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान व मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (ता. २०) पैठण येथे केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ‘‘मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान व मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (ता. २०) पैठण येथे केले.

पैठण येथे बुधवारी महिला मतदारांचा मेळावा घेण्यात आला. पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार स्वप्नील चव्हाण, शिक्षक, नोडल अधिकारी, महिला अंगणवाडी सेविका, विविध सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी, निवडणुकीच्या कामकाजात सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. स्वामी म्हणाले, ‘‘महिलांनी स्वयंस्फूर्तीने मतदानाविषयी जागृती करावी तसेच स्वतः मतदान करावे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले. आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या उपभोग घेत आहोत ती लोकशाही अस्तित्वात आणली.

या लोकशाहीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. देशातील मतदार संख्येच्या निम्मी संख्या ही महिला मतदारांची असून आपण मतदानाचा हक्क बजावावा. महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था मतदान केंद्रावर उभारण्यात येत आहे.’’

स्थानिक कलावंत अंकुश बनसोडे यांनी ‘चला मतदानाला जाऊया’ हे मतदान जागृती गीत सादर केले. तर अब्दुल कादर उर्दू हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदारजागृतीचा संदेश दिला.

निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

पैठण येथे बुधवारी निवडणूक पूर्वतयारीचा आढावा देखील घेण्यात आला. श्री. स्वामी यांनी पैठण विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पाडून मतदारांना आवश्यक सुविधा द्याव्यात. ‘सक्षम’ ॲप बाबत दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करावी. सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षाचे झेंडे किंवा इतर पोस्टर- बॅनर हटविण्याची कारवाई आचारसंहिता पथकाने तत्काळ करून अहवाल आचारसंहिता कक्षात सादर करावा.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT