Agricultural implements Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural implements : शेती अवजारे बँकांनी केले महिलांचे कष्ट कमी

Women's Economic Development Corporation : जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला बचत गटांना शेती अवजारे बॅंका दिल्या. त्यातून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी महिलांच्या जीवनात बदल होत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सूर्यकांत नेटके

Nagar News : जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला बचत गटांना शेती अवजारे बॅंका दिल्या. त्यातून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी महिलांच्या जीवनात बदल होत आहे. अवजारे बॅंकांमुळे शेतकरी कुटुंबातील एक हजारापेक्षा अधिक महिलांचे कष्ट कमी झाले. वेळेची बचत झाली. रोजगार उपलब्ध झाला आहे. हा उपक्रम नगर जिल्ह्यात तीन वर्षांपासून राबवला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महिला बचत गटासाठी शेती अवजारे बॅंक देण्याचा उपक्रम राबविणारा नगर हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. एक हजारापेक्षा अधिक महिला या अवजारांचा लाभ घेत आहे.

जिल्हा नियोजनामधून शेती अवजार बॅंका

महिला बचत गटातील बहुतांश महिला शेतकरी असल्याने तीन वर्षांपासून राज्यात पहिल्‍यांदात नगर जिल्ह्यात महिला बचत गटाला अनुदानावर शेती अवजारे बॅंका देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने त्यांच्याकडील महिला बचत गटांना समाजकल्याण विभागाच्या मदतीने आतापर्यंत तीन वर्षांत नगर तालुक्यातील १२, पाथर्डी, श्रींगोंदा, कर्जत, कोपरगाव, नेवासा तालुक्यात प्रत्येकी १३, तर राहुरी, राहाता तालुक्यांत प्रत्येकी १४ शेती अवजारे बॅंका दिल्या.

९५ टक्के शासनाकडून अनुदान यासाठी मिळाले असून, ५ टक्के वाटा महिला बचत गटांनी भरला आहे. १०६ गटांतील सुमारे १ हजार ६० महिला या अवजारे बॅँकांचा सध्या लाभ घेत आहेत. महिला बचतगटांना दिलेल्या शेती अवजारे बॅंकेत समारे १८३ प्रकारची अवजारे आहेत.

अवजारे बॅंकेतील शेती साहित्य

पिठाची गिरणी, मनुष्यचलित तसेच बॅटरीचलित तसेच सायकलचलीत फवारणी पंप, रोप लागवड यंत्र, ड्रमस्टिक हार्वेस्टर, मनुष्यचलित, बैलचलित कोळपे, बारा दाती पेरणीयंत्र, बैलचलित पेरणीयंत्र, दोन एचपी कडबाकुट्टी, बलराम बहुउद्देशीय शेती यंत्र, एकवीस फूट लांबीची शिडी, पाच एचपी विद्युतपंप, आकडी विळा, फूड ग्रेड ग्राइंडर, पलव्हाइजरसह शंभर किलो वजनकाटा व सीलिंग मशिन, स्पायरल सेपरेटर, मॅन्युअल कॉटन प्लांट पुलर, गकट, खुरपे, विळे, नारळ सोलणी यंत्र, इमस्टिक हार्वेस्टर, दुधारी खुरपे, आंबा झेला, दात्री विळा, खडा विळा, दातेली, रोप लागवड पंजा, दुधी विळा, सुधारित विळे, कायते, फावडे, पहार, टिकाव, घमेले, रोप लागवड पंजा, संरक्षक किट, ताडपत्री

कष्ट झाले हलके

अवजारे बॅंकांमुळे महिलांचे कष्ट कमी झाले आणि वेळेची बचत झाल्याचा अनुभव येत आहे. नगर तालुक्यातील अकोळनेरमधील अनामिका महिला गटाच्या ज्योस्त्‍ना सुभाष घोरडपडे यांनी सांगितले, की आमचा महिला बचत गट पाच-सात वर्षांपासून कार्यरत आहे.

महिला बचत गटाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शेती अवजारे बॅंक देणारा नगर जिल्हा पहिलाच आहे. आमच्या गटातील महिला शेतकरी असल्याने तीन वर्षांपूर्वी शेती अवजारे बॅंक मिळाली. महिलांना एक वर्षाच्या करारावर अवजारे दिलेली आहेत. महत्त्‍वाची अवजारे गरजेनुसार महिला अन्य शेतकऱ्यांना भाड्याने देत आहेत.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटातील जवळपास सर्वच महिला शेतकरी आहेत. शेतात राबणाऱ्या महिलांना शेतीत अत्याधुनिक अवजारांचा वापर करता यावा आणि रोजगाराचे साधनही उपलब्ध व्‍हावे या उद्देशाने शेती अवजारे बॅंका दिल्या आहेत. त्याचा ग्रामीण शेतकरी महिलांना चांगला फायदा झाल्याचा अनुभव येत आहे.
संजय गर्जे, ९८२२४२३६७५ जिल्हा समन्वयक,
महिला आर्थिक विकास महामंडळ, नगर आमच्या महिला बचत गटाला दोन वर्षांपूर्वी शेती अवजारे बॅंक मिळाली. त्यातील विविध शेती अवजारांचा शेतीसाठी वापर करता येतो. अवजारे वापरामुळे गटातील शेतकरी महिलांचे कष्ट कमी झाले. अवजारे बॅंकेतच मिळालेल्या पिठाच्या दोन गिरण्या गरजू महिलांना दिल्या. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटला. -
पल्लवी सुहास गोरखे, ९०६७६९८५२१ अध्यक्ष, सुद्रिकेश्‍वर महिला बचत गट, पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT