Bribe News Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe News : महिला सरपंच पतीसह ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Solapur Bribe Arrest : पांडुरंग रामचंद्र दिवसे ( वय ५१) व नंदाबाई पांडुरंग दिवसे (वय ४३, रा. दोघेही आलेगाव, ता. सांगोला) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

सुदर्शन सुतार

Solapur News : सभा मंडपाचे कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सांगोला तालुक्यातील आलेगावच्या महिला सरपंच व तिच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

पांडुरंग रामचंद्र दिवसे ( वय ५१) व नंदाबाई पांडुरंग दिवसे (वय ४३, रा. दोघेही आलेगाव, ता. सांगोला) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांना आलेगावमधील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम मिळाले होते. हे काम पूर्ण केल्यानंतर बिल मिळवून देण्यासाठी पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदाराकडे ८ हजार रुपये लाचेची मागणी केली.

त्यामुळे तक्रारदाराने याबाबत ‘लाचलुचपत’कडे तक्रार दिली. संशयित आरोपी पांडुरंग यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी केलेल्या कामाचे २००० रुपये व सध्याच्या कामाचे ८००० रुपये असे एकूण १०००० रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत सरपंच नंदाबाई यांच्याकडे पडताळणी केली असता, त्यांनी ही लाच पती पांडुरंग यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाच स्वीकारताना पांडुरंग यास रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT