Livestock Agrowon
ॲग्रो विशेष

Indigenous Breeding : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होत आहे उच्च दर्जाची दुधाळ गाय!

Technology in Farming : परराज्यांतील बाजारपेठेतून दुधाळ गाय, कालवडी विकत आणण्यापेक्षा जातिवंत दुधाळ गाय गोठ्यात तयार करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाला सुरुवात केली.

Team Agrowon

Livestock Management : डिंगोरे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिन रहाणे म्हणाले, की साधारणपणे सहा वर्षांपूर्वी अभ्यासू पशुपालक आणि पशुतज्ज्ञांनी राज्य, परराज्यांतील बाजारपेठेतून दुधाळ गाय, कालवडी विकत आणण्यापेक्षा जातिवंत दुधाळ गाय गोठ्यात तयार करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाला सुरुवात केली.

पहिल्यांदा पशुपालकांना जातिवंत पैदास, कालवड संगोपन, मुक्त गोठा व्यवस्थापन, आरोग्य आणि आहार व्यवस्थापन आणि प्रजनन नियोजनाविषयी तांत्रिक माहिती देण्यात आली. यातून पशुपालकांना व्यवस्थापनातील चुका समजल्या.

गोठ्यामध्ये दुधाळ गाय तयार करायची असेल तर रेतन आणि प्रजनन व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी जातिवंत वळूच्या रेतमात्रा, लिंगवर्गीकृत रेतमात्रा आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात आले. हिरकणी गटातील पशुपालकांनी जागतिक पातळीवर रॅंकिंग केलेल्या वळूंची निवड केली.

अमेरिकेतील ‘सीडीसीबी’ ही संस्था दर तीन महिन्यांनी जातिवंत १०० सिद्ध वळूंचे रॅंकिंग करते. यामध्ये प्रोजेनी टेस्टेट वळू (या वळूंच्या कालवडी दुधात आलेल्या असतात.) तसेच जिनोमिक टेस्टेड वळू (यांच्या कालवडी अजून दुधात नाहीत, परंतु जातिवंत सिद्ध वळू) निवडलेले असतात. केंद्र सरकारच्या नियमानुसार भारतात जर्सी आणि एचएफ जातींच्या

रेतमात्रा आयात केल्या जातात. या रेतमात्रांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी केलेली असते. हे वळू निवडताना काही पॅरामीटर (ट्रेट) असतात. प्रामुख्याने मिल्क प्रॉडक्शन ट्रेटमध्ये दूध उत्पादन, फॅट, प्रथिनांचे प्रमाण लक्षात घेतात. फर्टिलिटी इंडेक्स ट्रेटमध्ये कालवडी गाभण राहण्याचे प्रमाण, वासरू जन्मण्याची सुलभता पाहिली जाते.

लिनियर ट्रेटमध्ये बॉडी स्कोअर, लेग स्कोअर, अडर स्कोअर तपासला जातो. मस्टायटिस इंडेक्समध्ये सोमॅटिक सेल काउंट कमी असल्याची खात्री केली जाते. यामुळे गायीला कासदाह कमी होतो, प्रतिकारक्षमता चांगली असते.

प्रत्येक पशुपालकाकडील गायींची गरज लक्षात घेऊन पुढील कालवड कशा पद्धतीची तयार झाली पाहिजे, त्या दृष्टीने सिद्ध वळूची निवड केली जाते. यातून काही पशुपालकांनी आरोग्य व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन आणि प्रजनन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून एचएफ गायींचे दुग्धोत्पादन प्रति वेत (३०५ दिवस) ३,००० लिटर वरून ८,५०० नेण्यात यश मिळविले आहे.

काही पशुपालकांनी माहिती तंत्रज्ञान, ॲप, सेन्सरचा पशू व्यवस्थापनामध्ये वापर करत व्यवस्थापनामध्ये काटेकोरपणा आणला आहे. सर्वांच्या प्रयत्नातून राज्यातील पशुपालकांच्या गोठ्यामध्ये जातिवंत दुधाळ, चांगली रोगप्रतिकारक क्षमता असलेली संकरित गाय तयार होऊ लागली आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर

जातिवंत पैदास, आरोग्य व्यवस्थापनाच्या बरोबरीने पशुपालकांनी गायींच्या व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. याबाबत रवींद्र नवले म्हणाले, की गोठ्यामध्ये हवामान बदल दाखविणारे सेन्सर्स पाहायला मिळतात. त्यानुसार फॉगर्स, पंखे चालू बंद होतात. प्रत्येक गायीला संपर्क क्रमांक आहे. त्यांची विशिष्ट ॲपवर नोंद करण्यात आली आहे.

या गायीने दररोज सकाळ- संध्याकाळ किती दूध दिले, फॅट, एसएनएफ याची नोंद होते. दुधातील चढ-उतारानुसार व्यवस्थापन बदलेले जाते. कृत्रिम रेतन, लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा वापर तसेच भ्रूण प्रत्यारोपणाचा अवलंब, वळूची नोंद आदी महत्त्वाच्या शास्त्रीय गोष्टींच्या नोंदी ॲपवर पाहायला मिळतात. गायीच्या गळ्यात सेन्सर बेल्ट आहेत. यामध्ये शरीराचे तापमान, माज, फिरणे, रवंथपणाचा कालावधी आदी माहिती नोंदविली जाते. ‘आयडीएफए’तर्फे पशुपालकांना फेसबुक, व्हॉट्सॲप तसेच प्रशिक्षण, शिवारफेरीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT