Winter Season Agrowon
ॲग्रो विशेष

Winter Season : हिवाळी हंगाम आणि थंडीस सुरवात

Weather News : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१० हेप्टापास्कलपर्यंत हवेचे दाबात वाढ होत आहे. तसेच हवेचा दाब शनिवार पर्यंत राहणे शक्य आहे. आता हिवाळी हंगाम तसेच थंडी सुरू झाली आहे.

Team Agrowon

डॉ. रामचंद्र साबळे

Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१० हेप्टापास्कलपर्यंत हवेचे दाबात वाढ होत आहे. तसेच हवेचा दाब शनिवार पर्यंत राहणे शक्य आहे. आता हिवाळी हंगाम तसेच थंडी सुरू झाली आहे. उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील भागावर हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने उत्तर भारतातून वारे दक्षिण दिशेस वाहतील. उत्तर भारतातील थंड वारे दक्षिण दिशेने वाहण्यामुळे मध्य भारत व दक्षिण भारतातील थंडीचे प्राबल्य वाढण्यास सुरवात होईल. साहजिकच किमान तापमानात घसरण होण्यास सुरवात झाली असून महाराष्ट्रातील बहुतांशी भागात किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल आणि थंडीचे प्रमाण हळुवारपणे वाढत जाईल.

नोव्हेंबर महिन्याचे पहिल्या दोन आठवड्यात थंडीचे प्रमाण सौम्य राहील. मात्र १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत थंडीची तीव्रता वाढेल. कडाक्याच्या थंडीचा काळ असेल. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. तसेच फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी संपुष्टात येईल. हा हिवाळा सर्व पिकांना अनुकूल राहील. या हिवाळ्यात काही भागात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक भागात या वर्षी किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होणे शक्य असून त्या कालावधीत म्हणजेच १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या काळात विशेष काळजी घेणे भाग पडेल.
सध्या अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराचे तापमान २९ अंश पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे हवामान स्थिर राहील. तर प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान, पेरूजवळ १४ अंश व इक्वेडोरजवळ २१ अंश सेल्सिअस राहील. ला निनाचा प्रभाव सध्या नाही.

१) कोकण ः
मंगळवारी व बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मि.मी. पावसाची शक्यता असून, रत्नागिरी जिल्ह्यात ३ मि.मी. आणि रायगड जिल्ह्यात १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. त्यामुळे हळुवारपणे किमान तापमानात घसरण होण्यास सुरवात होईल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात ५ ते ७ किमी राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश राहील तर रायगड व ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात या आठवड्यात घसरण सुरू होऊन थंडी सुरू होण्यास अनुकूल बनेल. त्याचा फायदा आंबा मोहरास होईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ८० ते ८३ टक्के राहील, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ती ५२ ते ५४ टक्के इतकी कमी राहील.

२) उत्तर महाराष्ट्र ः
नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा नाशिक व जळगाव जिल्ह्यात पूर्वेकडून राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यात २४ अंश आणि जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ५३ टक्के तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ४० ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २९ टक्के राहील.

३) मराठवाडा ः
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता मंगळवारी व बुधवारी नाही. धाराशिव, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून राहील, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर लातूर जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. तसेच परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. धाराशिव व लातूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८३ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात ६२ ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, नांदेड, लातूर व बीड जिल्ह्यात ४० ते ५० टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ३० ते ३४ टक्के राहील.

४) पश्चिम विदर्भ ः
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्‍ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा पूर्वेकडून व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ५२ ते ५८ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २९ टक्के राहील.

५) मध्य विदर्भ ः
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. नागपूर,यवतमाळ जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६१ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३३ टक्के राहील.

६) पूर्व विदर्भ ः
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० किमी राहील. गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ४ कि.मी. राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ते १९ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. उर्वरित जिल्ह्यात ते निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ६५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील.

७) दक्षिण पश्चिम महाराष्ट्र ः
मंगळवार व बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात ५ ते १० मिमी, सांगली जिल्ह्यात २ ते ८ मिमी, सातारा जिल्ह्यात २ ते ४ मिमी, सोलापूर जिल्ह्यात १ मिमी, पुणे जिल्ह्यात व अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून व पूर्वेकडून राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ किमी राहील. पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात तो ११ ते १२ किमी राहील, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात तो ७ ते ९ किमी राहील. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के व दुपारची ४० ते ५० टक्के राहील.

कृषी सल्ला ः
१) पूर्वहंगामी ऊस लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.
२) दोन पाणी देणे शक्य आहे तेथे हरभरा पेरणी करावी.
३) पाच पाणी देणे शक्य आहे तेथे १५ नोव्हेंबरदरम्यान गव्हाची पेरणी करावी.
४) सूर्यफुलाची पेरणी करावी.
५) कांदा रोपे तयार करण्यासाठी गादीवाफ्यावर बियाणे पेरणी करावी.

(ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, सदस्य, दक्षिण आशिया फोरम ऑन ॲग्रिकल्चर मेटिरॉलॉजी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Winter Session of Parliament : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून

SCROLL FOR NEXT