Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदलासंदर्भात श्रीमंत देश खिशात हात घालणार?

Environment Conservation : हवामान बदलांचा सर्वांत मोठा फटका गरीब आणि विकसनशील देशांना बसत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

Team Agrowon

Global Warming : येथील संयुक्त राष्ट्रांची हवामानबदलविषयक परिषद अखेरच्या टप्प्यात आली असताना वैश्विक तापमानवाढ रोखण्यासाठी श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना नेमकी किती आर्थिक मदत करावी याबाबतचा आराखडा अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही. चर्चेच्या पातळीवर देखील उदासीनता दिसू लागल्याने पर्यावरणविषयक हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या संघटना संमेलनस्थळाच्या बाहेरच मोठे आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.

श्रीमंत देश पर्यावरण संरक्षणासाठी स्वतःच्या खिशात हात घालणार का, असा सवाल विचारला जात आहे. हवामान बदलांचा सर्वांत मोठा फटका गरीब आणि विकसनशील देशांना बसत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

गरीब देशांना भरपाई द्यायची झाल्यास त्यांना वर्षाकाठी १ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक निधी द्यावा लागेल. याशिवाय ते पूर्णपणे स्वच्छ ऊर्जेच्या वापराकडे वळावेत म्हणून देखील भरीव मदत द्यावी लागेल. ही मदत देण्यासाठी श्रीमंत देश खरोखरच खिशात हात घालणार का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

या संमेलनामध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेवर पर्यावरणविषयक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून चर्चेच्या पातळीवरून हा मुद्दा अंमलबजावणीच्या पातळीवर यायला हवा अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ठोस काहीतरी निष्कर्ष समोर येऊ शकतो अपेक्षा व्यक्त होते आहे.

या संमेलनावर जीवाश्म इंधन लॉबीचा मोठा प्रभाव दिसून येत असल्याने अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक अल गोर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जीवाश्म इंधन लॉबीचे जवळपास दीड हजारांपेक्षाही अधिक प्रतिनिधी या संमेलनामध्ये सहभागी झाल्याने पर्यावरण संघटनांची चिंता आणखी वाढली आहे.

‘जी-२०’ मध्येही मंथन होणार

हवामान बदलाच्या अनुषंगाने जी- २० देशांसाठी आता काही तरी ठोस पावले उचलावी लागतील असे संयुक्त राष्ट्राचे हवामानबदल विषयक विभागाचे प्रमुख सिमॉन स्टेईल यांनी म्हटले आहे. जी मंडळी रिओतील चर्चेत सहभागी झाली होती त्यांनी कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आता ठोस कृती करणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

जी-२० देशांच्या संमेलनाला सोमवारपासून सुरुवात होते आहे. सोमवार (१८) आणि मंगळवार (१९) असे दोन दिवस हे संमेलन होणार असून, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनामध्ये जागतिक तापमानवाढ हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असेल असे सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

Lumpy Skin Disease: लम्पी नियंत्रणाची त्रिसूत्री- आहार, स्वच्छता आणि औषधोपचार

Onion Policy : राज्य सरकारला खरोखरच कांदा धोरण ठरवायचे आहे का?

eSakal No 1: 'ई-सकाळ'ची पुनश्च एकदा गगनभरारी ! २१.२ मिलियन वाचकांच्या पंसतीची मोहोर कायम

Soil Testing : नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी

SCROLL FOR NEXT