Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : 'पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार'

Team Agrowon

Latur News : औसा तालुक्यातील काही भागात शनिवारी (ता. २१) ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली असून काढणीस आलेल्या सोयाबीन व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची पाहणी सोमवारी (ता. २३) आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत केली.

पाहणी दरम्यान बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या व सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.

औसा तालुक्यातील जवळगा पोमादेवी, तुंगी व सोन चिंचोली या भागातील बाधित क्षेत्राची पाहाणी आमदार पवार यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे, बांधकाम विभागाचे अभियंता रोहन जाधव, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, बाजार समितीचे संचालक युवराज बिराजदार व खाते प्रमुख उपस्थित होते.

यंदा मोसमी पाऊस वेळेवर झाला त्यामुळे जून महिन्यात जवळपास खरीप हंगामातील शंभर टक्के क्षेत्रावर पेरणी झाली मध्यंतरी पाऊस समाधानकारक झाला त्यामुळे सोयाबीन उत्पन्न वाढीच्या दृष्टीने वातावरण पोषक असताना शनिवारी औसा तालुक्यातील काही भागात ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाली त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी करुन जमिनीवर ठेवले होते तर काही क्षेत्रावरील सोयाबीन काढणीच्या प्रतिक्षेत होते. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आजघडीला या भागातील शिवारात पाणी साचले आहे.

गेल्या चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत असताना यंदा काही भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावेळी झालेल्या नुकसानीच्या संदर्भात नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Sugarcane Season : साताऱ्यात उसाच्या गाळपात निवडणुकीची धामधूम

Retreating Monsoon : परतीच्या पावसाचा दणका, लातुरात घरात शिरले पाणी

Satara Rain Update : सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

Paddy Crop Damage : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने भात पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT