Wild Boars  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Boar : रानडुकराला उपद्रवी वन्य प्राणी घोषित करा

Wild Boar Crop Damage : जिल्ह्यात रानडुकरांचा प्रचंड उपद्रव सुरू झाला असून विशेषतः उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः शेती सोडून देण्याची वेळ आली आहे.

Team Agrowon

Solapur News : रानडुकरामुळे शेतीच्या अस्तित्वावरच गदा आली असून, वनक्षेत्र सोडून रानडुक्कर मारण्यास परवानगी द्या, अशी मागणी उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली. खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी ही मागणी केली.

जिल्ह्यात रानडुकरांचा प्रचंड उपद्रव सुरू झाला असून विशेषतः उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः शेती सोडून देण्याची वेळ आली आहे. नान्नज माळढोक पक्षी अभयारण्याच्या लगतच्या परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे.

याबाबत शेतकरी वारंवार वन विभागाकडे बंदोबस्तासाठी हेलपाटे घालत आहेत. मात्र स्थानिक प्रशासन त्यांना दाद देत नाही. याबाबतच्या तक्रारी खासदार शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे यांनी नान्नज येथेच वनविभागाच्या विश्रामगृहावरच तालुक्यातील रानडुकरांचा उपद्रव असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सोलापूरचे नूतन उपवनसंरक्षक कुलवंतसिंह उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी

नान्नज येथील माळढोक अभयारण्यातील अधिकारी शेतकऱ्यांची कशी अडवणूक करतात याबाबतच्या तक्रारीचा पाढा वाचला. मार्डीच्या बाळासाहेब पाटील यांनी गावाला रानडुकरापासून किती उपद्रव आहे याची माहिती दिली. या वेळी कोंडी येथील बाबाराजे निळे यांनी गावकऱ्यांना विश्‍वासात न घेता कोंडी परिसरात वनक्षेत्र घोषित करण्यात आले, यामुळे कोंडीचा खडी उद्योग बंद पडला.

त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी कार्यालयातच बसून कारवाई केल्यामुळे कोंडी येथील शंभर घरे आज राखीव वनक्षेत्रात नोंदवली जात असल्याची माहिती दिली. गावडी दारफळ येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नागेश पवार यांनी रानडुकराला उपद्रवी वन्यप्राणी घोषित करा, अशी मागणी करत वनपरिक्षेत्राच्या बाहेर रानडुक्कर मारण्यास परवानगी द्या अशी मागणी केली. मागणीला उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला.

अकोलेकाटीचे देविदास लामकाने, नामदेव लामकाने, मोहोळचे सुलेमान तांबोळी यांनीही तक्रारी मांडल्या. बैठकीला पृथ्वीराज माने, प्रल्हाद काशीद, मार्डीचे बाबासाहेब पाटील, तिर्हे येथील भारत जाधव, पाकणीच्या ग्रामपंचायत सदस्य परिणिता शिंदे, सुदर्शन आवताडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या वेळी बोलताना श्री. कुलवंतसिंह यांनी स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व प्रश्‍न तत्काळ सोडवले जातील, असे आश्‍वासन दिले.

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंबी

नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यातील वनपाल संतोष मुंडे व नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप कोरे यांच्याबाबत शेतकऱ्यांनी गंभीर तक्रारी केल्या. मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराची उदाहरणे शेतकऱ्यांनी खासदार शिंदे यांना सांगितली. कोरे हे शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात अशी तक्रार केली. यावर चिडलेल्या शिंदे यांनी या दोघांनी वर्तन न सुधारल्यास कारवाईचा इशारा देत चांगलीच तंबी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : ‘झेडपी’, पंचायत समित्यांचा बिगुल

Fertilizer Shortage : युरिया, डीएपीचा तुटवडा, लिंकिंगने शेतकरी त्रस्त

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

SCROLL FOR NEXT