Akola News: अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे कापूस खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाहनाच्या रचनेत बदल करून कापसाचे वजन कमी दाखवण्याचा डाव शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला. या प्रकरणी व्यापारी, त्याचा साथीदार, हमाल आणि वाहन चालक अशा चार जणांविरोधात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे..मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी सायंकाळच्या सुमारास संबंधित व्यापारी आणि त्याचा साथीदार कापूस खरेदीसाठी गावात आले होते. गावातील शेतकरी संदीप धांडे यांनी आपल्याकडील कापूस विक्रीसाठी दाखविला. सौदा ठरल्यानंतर व्यापाऱ्याच्या आयशर वाहनाचे काट्यावर खाली (रिकामे) वजन करण्यात आले. यावेळी व्यापारी, त्याचा साथीदार व हमाल उपस्थित होते..Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात.यानंतर वाहनात कापूस भरण्याचे काम सुरू असताना वाहनाच्या रचनेत संशयास्पद बदल असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता वाहनात चार ठिकाणी पेट्या तयार करून त्यामध्ये वाळू साठवण्यासाठी जागा करण्यात आल्याचे आढळले. या पेट्यांवरून पत्र्याचे झाकण बसविण्यात आले होते..शेतकऱ्यांच्या मते, वाहनाचे खाली वजन करण्यासाठी जाताना या पेट्यांमध्ये आधीच वाळू भरलेली होती. मात्र गावात कापूस खरेदीसाठी येताना रस्त्यातच ती वाळू खाली टाकण्यात आली, त्यामुळे आधीचे वजन जास्त आणि कापूस भरल्यानंतरचे वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.दरम्यान, हा प्रकार उघड होताच व्यापारी, हमाल आणि वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाले, मात्र त्यांचा एक साथीदार गावकऱ्यांच्या हाती लागला..Cotton Purchase : ‘सीसीआय’च्या बार्शीटाकळी केंद्रावर कापूस खरेदीस प्रारंभ.या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित वाहनही जप्त करण्यात आले आहे..वजनात फसवणूकसध्या खेडा खरेदीला वेग आला असून छोटे व्यापारी गावोगावी जाऊन कापूस खरेदी करीत आहेत. यादरम्यान वजनात शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.