Land Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Land : पडीक जमिनी कोणाच्या?

Uncultivated Land : अलीकडे वाढत्या पडित (पडीक) शेती क्षेत्राची चर्चा होत नाही. शेती तर घेतली जाते, पण शेती कसून शेतीमालातून जेवढे पैसे मिळणार नाहीत, त्यापेक्षा जास्त पैसे शेती पडीक ठेवून मिळतात.

डॉ. सोमिनाथ घोळवे

डॉ. सोमिनाथ घोळवे

अलीकडे वाढत्या पडित (पडीक) शेती क्षेत्राची चर्चा होत नाही. शेती तर घेतली जाते, पण शेती कसून शेतीमालातून जेवढे पैसे मिळणार नाहीत, त्यापेक्षा जास्त पैसे शेती पडीक ठेवून मिळतात. त्यामुळे पीक घेण्याऐवजी शेती पडीक ठेवण्यातून फायदेशीर आहे, अशी शेती विकत घेणाऱ्यांची मानसिकता असते.

कारण दिवसेंदिवस जमिनीचे दर प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्या वाढत्या दरामुळे शेतीतील (जमिनीतील) उत्पन्नापेक्षा शेतीच्या दरवाढीतून जास्त उत्पन्न मिळते. शिवाय ते उत्पन्न करमुक्त असते. हे पडीक क्षेत्र शहरांजवळच्या गावांमध्ये वेगाने वाढत आहे.

तसेच शहरांपासून दूरच्या गावात देखील वाढत आहे. सगळीकडे शहरीकरणाचा वाण आणि गुण असे चित्र दिसते आहे. शहरांजवळच्या गावांमध्ये बिगर कृषी (NA करणे) वेगाने वाढत आहे. ही शेती व्यावसायिक व बांधकाम उद्योग क्षेत्रात जात आहे.

रस्त्याच्या कडेने ढाबे टाकणे, पेट्रोल पंप टाकणे, माती आणि दगडी विटा तयार करणे, फार्म हाउस उभारणे, रस्त्याचे रुंदीकरण करणे अशा विविध मार्गाने शेकडो हेक्टर शेती पडीत पडणे वाढू लागले आहे. याचा परिणाम शेतीमाल कमी उत्पादन आणि अन्न सुरक्षेवर होऊ लागला आहे.

पडीक जमिनी कोणाच्या? तर या जमिनी कष्टकरी, शेतकरी वर्गाकडून शहरातून उदयाला आलेल्या नव मध्यम वर्गाने खरेदी केलेल्या आहेत. यात मुख्यतः डॉक्टर्स, इंजिनिअर्स, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, स्थानिक राजकीय नेतृत्व, शासकीय उच्च पदस्थ, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. हा वर्ग शेतीला व्यवस्थित तारेचे कुंपण, मालकी हक्काचा बोर्ड लावतात.

पडीक जमिनीत विहीर खोदणे, पाइपलाइन टाकणे अशी कामे करूनही घेतली जातात. मात्र पीक घेण्याऐवजी त्या जमिनीत तण आणि काटेरी झाडे वाढलेली असतात. अनेकांकडून फार्म हाउस बांधले जातात, आठवड्याच्या शेवटचा दिवस जाऊन तेथे राहतात. पडीक शेतीचे क्षेत्र वाढत आहे, याची चर्चा होत नाही, की शासन त्यावर नियंत्रण करायला तयार नाही.

पडीक शेती ही नफ्याची आहे असे शेती पडीक ठेवणाऱ्यांकडून सांगण्यात येते. अशाच गतीने पडीक क्षेत्र वाढत राहिले, तर भविष्यातील कृषी क्षेत्राची वाटचाल गंभीर परिस्थितीला आमंत्रण देणारी ठरेल, हे मात्र निश्‍चित!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT