Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Election Update : नगर जिल्ह्यात शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर आता प्रचारातील कार्यकर्ते आता आकडेमोडीत रंगले आहेत.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर आता प्रचारातील कार्यकर्ते आता आकडेमोडीत रंगले आहेत. आपल्या मतदार संघात कोण निवडून येणार, कोणत्या भागाला किती मतदान मिळणार, याचा कयास बांधत असतानाच आपला नेता कसा निवडून येणार याचा अंदाज सांगितला जात आहे. आता गावगावांत, पारावर याच गप्पा रंगल्या आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मागील पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. आधी दहा वर्षे कै. दिलीप गांधी, तर गेल्या पाच वर्षांपासून डॉ. सुजय विखे पाटील खासदार होते. तीनही वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता. या वेळी महायुतीकडून सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके यांच्यात लढत झाली.

सुरुवातीला सोपी वाटणारी लढत नंतर अटीतटीची झाली. दोघांमधील झालेल्या चुरशीत नक्की कोण निवडून येईल सांगता येत नसले तरी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते विजयाचा दावा करीत आहेत. ग्रामीण भागात मात्र शेती, दुधासह अन्य प्रश्नावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काही प्रमाणात रोष असल्याचे दिसून आले.

शिर्डी लोकसभा मतदार संघात पंधरा वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. २००९ ला भाऊसाहेब वाकचौरे, तर २०१४ व २०१९ मध्ये सदाशीव लोखंडे निवडून आले. काँग्रेसमध्ये गेलेले भाऊसाहेब वाकचौरे या वेळी पुन्हा शिवसेनेत आले व महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तर महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदाशीव लोखंडे उभे होते.

लोखंडे यांच्यावर पहिल्यापासूनच लोकांची नाराजी, दूध उत्पादक शेतकरी, निळवंडेच्या पाण्याचा प्रश्न निवडणुकीत चर्चिला गेला. दुरंगी होणाऱ्या निवडणुकीत वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्या उमेदवारीने तिरंगी निवडणूक झाली आहे. तिघांनीही विजयाचा दावा केला आहे. वाढलेली चुरस पाहता आज तरी नक्की कोण निवडून येणार हे सांगणे जाणकारांनाही कठीण झाले आहे.

शेती, दुधाचा फटका बसणार का?

नगर जिल्ह्यात शेती, दूध व्यवसायाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मात्र शेतीमालाला दर नाही. कांद्याचे दर पडल्याने संताप व्यक्त होत आहे. नगर, शिर्डी लोकसभा मतदार संघांत मतदानाला येताना काही शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा आणि दुधाच्या केटल्या घेऊन व दुध ओतत निषेध कर मतदान केले आहे. साधारणपणे शेतीप्रश्न, दूध, कांदा व अन्य प्रश्नाबाबत शेतकऱ्यांचा संताप असला तरी त्याचा मतदावर किती परिणाम झाला? त्याचा फटका बसला असेल का, यावर विजयाचे गणित मांडले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT