Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Mill Election: ‘माळेगाव’वर कोणाची सत्ता, आज मतदान

Sugar Factory Election: माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी शुक्रवारी (ता. २०) शांत झाल्या.

गणेश कोरे

Pune News: माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी शुक्रवारी (ता. २०) शांत झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या तीन विविध पॅनेलद्वारे रंगलेल्या निवडणुकीत एकमेकांची वये आणि कामाच्या पद्धतींच्या आरोपांवर रंगलेल्या प्रचारानंतर रविवारी (ता. २२) मतदान होत आहे. या मतदानात ‘माळेगाव’वर कोणाची सत्ता येणार याबाबतचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

शुक्रवारी (ता. २०) झालेल्या सांगता सभेत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या सांगता सभेत कारखान्याचा २५ वर्षांत जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास पुढील ५ वर्षांत होणार आहे. येथील सभासदांना उच्चांकी ऊस दर देऊन या दराची स्पर्धा राज्यातील साखर कारखान्यांशी करणार आहे. त्यासाठी आमच्या कर्तबगारीचा झेंडा माळेगाववर उभारायचा आहे. त्यामुळे निळकंठेश्‍वर पॅनेलच्या उमेदवारांना सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

तर ‘‘माझं वय काढता? तुमच्या घरात तीन खासदार, दोन आमदार असताना आमच्या कारखान्याचे अध्यक्ष व्हायला निघालात? उद्या काटेवाडीच्या पोलिस पाटलाला जागा खाली करायला लावाल,’’ अशी टीका सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे नेते आणि माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंदरराव तावरे यांनी केली. तसेच उद्या येणाऱ्या लक्ष्मीला नमस्कार करा. मात्र आपल्या वाडवडिलांनी काढलेला कारखाना आपल्याला जतन करायचाय. वाढवायचाय. खासगीकरणाच्या संकटातून तो वाचविला नाही तर पुन्हा निवडणूक होणार नाही. छत्रपतीचे झाले ते आपले होईल, असे आवाहन केले.

तर बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पवार म्हणाले, ‘‘माळेगावचा मागील दशकांचा इतिहास आणि असलेला नावलौकीक पाहता मी त्याच्यात कधीही राजकारण येऊ दिल नाही. सभासदांचे हित कामगारांच भलं हा दृष्टिकोन मी कायम ठेवला. आजवर अनेक निवडणुका झाल्या अनेक जण निवडून आले. निवडून आल्यानंतर पुन्हा एकत्र काम केले. पण यंदा या निवडणुकीत राजकारण आणायचे नाही अशी भूमिका घेऊनही दुर्दैवाने वेगळे राजकारण आणले.

हे राजकारण कारखान्याच्या अर्थकारणासाठी, सभासदांच्या भल्यासाठी आणि कामगारांच्या हिताची जपवणूक करण्यासाठी योग्य नाही. मात्र माझा कारखान्याच्या सभासदांवर विश्‍वास आहे. ते योग्य आहे त्यालाच साथ देतील. बळीराजा पॅनेलचे सर्व उमेदवार एका जिद्दीने लढत आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रचंड साधनसामग्रीचा डोंगर दिसत आहे. पण तुमच्याकडे साधनसामग्री नसून, सर्वसामान्य सभासदांचा समुद्र आहे. या समुद्र उत्तर देऊ शकतो. असा आत्मविश्‍वास उमेदवारांना दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT