Devna Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Bodwad Irrigation Project : बोदवड उपसा योजनेचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार?

Irrigation Scheme : जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील ५३ हजार ४४९ हेक्‍टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणारी ही उपसा सिंचन योजना आहे.

Team Agrowon

Jalgaon News : बोदवड, मुक्‍ताईनगरसह जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील सहा तालुक्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी मागील वर्षी ९६ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे.

यामुळे दुष्काळी भागात गणल्या जाणाऱ्या बोदवडला लाभ होणार आहे. पण योजनेचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होईल, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या योजनेत दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात जुनोने धरण व दुसऱ्या टप्प्यात जामठी धरण आहे.

मात्र २०१७ ला राज्य मंत्रिमंडळाची जी एकला मान्यता मिळाली ती केवळ टप्पा एकला मिळाली आहे. त्यातच टप्पा एकचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले असून, टप्पा दोनच्या कामाला गती मिळणार आहे.

आस होणार लाभ

जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील ५३ हजार ४४९ हेक्‍टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणारी ही उपसा सिंचन योजना आहे. या प्रकल्पात जळगाव जिल्ह्यातील ३३ हजार ६६८ हेक्‍टर आणि बुलडाणा जिल्ह्यातील १९ हजार ७८१ हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाम होणार आहे.

दोन टप्प्यांत काम

२०११ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १४ हजार ९९४ हेक्‍टर, दुसऱ्या टप्प्यात ३८ हजार ४५५ हेक्‍टर जमिनीवर सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यात बोदवड, जामनेर आणि मुक्‍ताईनगर तालुक्‍यांना लाभ होणार आहे. त्यासाठी कामाचा प्रारंभ करण्याची मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT