Agriculture Inputs Update: आगामी खरीप हंगामाच्या चंद्रपूर जिल्ह्यात युरिया खताचा साठा समाधानकारक असून सध्या सुमारे २० हजार टन युरिया शिल्लक आहे. त्यामुळे खत टंचाईची शक्यता नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले असून, शेतकऱ्यांना खरेदीपूर्वी खात्री करूनच खत विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..जिल्ह्यात दर वर्षी खरीप हंगामासाठी सुमारे ५० हजार टन युरियाची गरज भासते. यंदा सध्या उपलब्ध असलेला २० हजार टन साठा पाहता तातडीने टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने किंवा भीतीपोटी खत साठवणूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे..Subsidized Urea Misuse: अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यग्र असून, गरजेनुसारच खत खरेदी करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. बाजारातही सध्या स्थिरता असून अनावश्यक साठेबाजी किंवा आगाऊ खरेदीचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. मात्र, काही ठिकाणी अनावश्यक साठेबाजी होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत..कृषी अधिकाऱ्यांनी खत विक्रीत पारदर्शकता राखण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार आणि योग्य प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यास सांगितले आहे. तसेच, कोणत्याही विक्रेत्याने किंवा शेतकऱ्याने जास्त प्रमाणात खत खरेदी करून साठा करून ठेवू नये, यासाठी विक्रीपूर्वी खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे..Urea Production: सध्याची परिस्थिती अत्यंत अडचणीची, देशांतर्गत युरिया उत्पादनावर परिणाम.दरम्यान, खरीप हंगाम जवळ येत असल्याने पुढील काही आठवड्यांत खताची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करून गरजेनुसार पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत..‘साठवणूक करू नये’शेतकऱ्यांनी घाबरून किंवा अफवांवर विश्वास ठेवून खत साठवणूक करू नये. आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.