Tur rate Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Bajarbhav: तुरीला मार्चनंतर काय भाव मिळणार ? हमीभावाच्या खाली तूर विकी टाळण्याचे आवाहन

Tur Rate : देशातील बाजारात नवी तूर ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयाने विकली जात आहे. तर दुसरीकडे हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली.

अनिल जाधव

Pune News : देशातील बाजारात नवी तूर ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयाने विकली जात आहे. तर दुसरीकडे हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली. सरकार यंदा संपूर्ण तूर हमीभावाने खेरदी करणार आहे.

त्यामुळे यंदा तूर बाजाराला हमीभावाचा आधार असेल. तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीचे पॅनिक सेलिंग टाळावे, असे आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

तुरीचे भाव सध्या कमी होण्याला प्रामुख्याने दोन कारणे आहेत. यंदा तुरीची लागवड जवळपास १४ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच यंदा पाऊसमान चांगले होते. परिणामी उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढण्याचा अंदाज आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये नवी तूर विक्रीसाठी येत आहे.

याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी विरली. तूर सध्या हमीभावापेक्षा कमी दरात विकली जात आहे. केंद्राने यंदा तुरीसाठी ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या तूर ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयाने विकली जात आहे.

सरकारने यंदा देशीतील उत्पादन ३५ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त करत तुरीच्या शुल्कमुक्त आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली. शुल्कमुक्त आयातीमुळे देशात २०२४ मध्ये जवळपास १२ लाख टनांची आयात झाली. ही आयात पुढील वर्षभर कायम राहण्याचा अंदाज आहे. देशातील नव्या मालाची आवक आणि खुली आयात याचा सध्या दरावर परिणाम दिसून येत आहे.

सध्या तुरीचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो. पण या काळात यंदा शेतकऱ्यांंना महीभावाचा पर्याय असेल. सरकारने यंदा शेतकऱ्यांकडून पूर्ण तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.

कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार पूर्ण तूर हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली तूर विकू नये. शक्य असल्यास हमीभावानेच विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

गेल्या हंगामात तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे आयात वाढूनही तुरीचा स्टाॅक नगण्य आहे. त्यामुळे यंदा तूर उत्पादन वाढले तरी मागणी आहे. परिणामी बाजारातील तुरीची आवक कमी झाल्यानंतर तुरीच्या दरात चांगली वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. मार्चनंतर तुरीचा बाजार ८ हजारांच्या दरम्यान पोचले.

नंतर बाजारातील आवक कमी होऊन बाजारभाव पुन्हा वाढतील. तुरीचा बाजार यंदा ८ हजार ५०० ते ९ हजारांचाही टप्पा पार करू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही परिस्थिती लक्षात ठेऊन विक्रीचे नियोजन करावे. तसेच बाजारातील परिस्थिती बदललल्यानंतर दरावरही परिणाम होऊ शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update : वाशीम, अकोल्यात पावसाचा पुन्हा जोर

Rain Crop Damage : २८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका

Intervierw with Sunil Tambe: मॉन्सूनने घडवली शेती, माती, संस्कृती

World Rabies Day: जागरूकतेतूनच रेबीज पासून बचाव शक्य

iPhone Craze: आयफोन नावाचे स्टेट्स सिम्बॉल

SCROLL FOR NEXT