Rural Development: महाराष्ट्रात पशूंच्या बाबतीत प्रचंड प्रादेशिक विविधता दिसते. स्थानिक लोकसमूह, भूगोल आणि हवामान यांचा त्याच्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे कितीही वंश सुधारण्याचे, संकरीकरणाचे प्रयोग केले गेले तरीही पशुगणनेमध्ये अशा स्थानिक पशुप्रजातींची संख्या ही तीन चतुर्थांश इतकी दिसून येते. सरसकट गावठी किंवा शास्त्रीय भाषेत एन. डी. (नॉन डिस्क्रिप्ट) असे त्याला संबोधून एकंदर संकरीकरण आणि वंशसुधार वगैरेच कसे महत्त्वाचे आहे
हेच मुख्यतः सरकारी धोरणातून दिसून येते. स्थानिक जनावरांचे प्रमाण, त्यांचे गुण, त्यांचे उपयोग, उपयुक्तता हे मुद्दे दुर्लक्षित राहतात. जनावरांच्या स्थानिक जाती या त्या त्या भूभागातील लोकसमूहांचे परंपरागत, सांस्कृतिक ज्ञान, स्थानिक शेती आणि गरजा यातून तयार झालेल्या आहेत. जनावरांच्या स्थानिक प्रजाती आणि त्यांचे संवर्धन करणारे समूह म्हणजे ज्ञान, माहितीचे मौल्यवान भांडार आहेत.
स्थानिक जनावरांच्या जाती टिकवायच्या असतील तर ही जनावरे पाळणाऱ्या लोकसमुहांकडे असलेले ज्ञान, अनुभव आणि परंपरागत शहाणपण याचा नीट उपयोग केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. पशुसंवर्धन हे पशुपालक समुदायांच्या सामूहिक वारशाचे प्रतिनिधित्व करत असते आणि त्यांच्या एकंदर उत्पादन पद्धतीपासून वेगळा विचार करून ते शाश्वत ठरू शकत नाही.
आधुनिक प्रशुप्रजनन आणि तंत्रज्ञान हे केवळ मर्यादित गुणांचा विचार करून पशुधनाच्या विकासाचा विचार करते. किंबहुना, हे तंत्रज्ञान वापरत असताना असेही अनुभव येतात की देशी/ स्थानिक जातींना ते अनुकूल नाहीत. असे तंत्रज्ञान आणि विस्तार व विकास कार्यक्रम हे क्वचितच स्थानिक, सामाजिक, आर्थिक आणि लोकसहभागाचा विचार करतात. परिणामी कार्यक्रम, प्रकल्प संपला की लोक त्याची जवाबदारी घेत नाहीत आणि तो लोकांचा कार्यक्रम होत नाही.
महाराष्ट्राचा विचार केला तर अजूनही दुर्गम भागात आणि मुख्यतः कोरडवाहू क्षेत्रात स्थानिक पशुधन आणि त्याभोवती विशिष्ट लोकसमूह असा संबंध दिसून येतो. अशा प्रकारच्या पशुपालनाची सामर्थ्यस्थळे, मर्यादा आणि धोके याबद्दल ऊहापोह झालेला आहे. या लेखामध्ये महाराष्ट्राची एकंदर पशुपालनाची व्यवस्था, त्यावर अवलंबून असलेले लोकसमूह आणि सरकारी गुंतवणुक नेमकी कुठे आवश्यक आहे या बाबींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू.
पशुपालनातील विविधता
महाराष्ट्रात पशूंच्या बाबतीत प्रचंड प्रादेशिक विविधता दिसते. स्थानिक लोकसमूह, भूगोल आणि हवामान यांचा त्याच्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे कितीही वंश सुधारण्याचे, संकरीकरणाचे प्रयोग केले गेले तरीही पशुगणनेमध्ये अशा स्थानिक पशुप्रजातींची संख्या ही तीन चतुर्थांश इतकी दिसून येते. सरसकट गावठी किंवा शास्त्रीय भाषेत एन. डी. (नॉन डिस्क्रिप्ट) असे त्याला संबोधून एकंदर संकरीकरण आणि वंशसुधार वगैरे) कसे महत्त्वाचे आहे हेच मुख्यतः सरकारी धोरणातून दिसून येते.
स्थानिक जनावरांचे प्रमाण, त्यांचे गुण, त्यांचे उपयोग, उपयुक्तता हे मुद्दे दुर्लक्षित राहतात. जनावरांच्या स्थानिक जाती या त्या त्या भूभागातील लोकसमूहांचे परंपरागत, सांस्कृतिक ज्ञान, स्थानिक शेती आणि गरजा यातून तयार झालेल्या आहेत. जनावरांच्या स्थानिक प्रजाती आणि त्यांचे संवर्धन करणारे समूह म्हणजे ज्ञान, माहितीचे मौल्यवान भांडार आहेत. त्यामुळे स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग घेणे, त्यांच्याशी समान भागीदारी करणे, स्थानिक जातींची ओळख आणि नोंदणी या बद्दल विचार करणे गरजेचे आहे.
स्थानिक जाती काटक, रोगप्रतिकारक्षम आणि स्थानिक वातावरणात टिकाव धरून राहणाऱ्या असतात. वास्तविक त्यांचे हे गुणधर्म लक्षात घेऊन कठीण वातावरणात वाढण्यासाठी, रोगांचा प्रतिकार करण्यासाठी, कठीण भूप्रदेशात लांब अंतरावर स्थलांतरित होण्यासारख्या कठोर राहणीमानाचा सामना करण्यासाठी, बाहेरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी, भक्षकांना रोखण्यासाठी आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उद्देशांसाठी या जातींचे प्रजनन केले गेले आहे. अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात विविधता असलेले महाराष्ट्र हे कदाचित एकमेव राज्य असावे. येथे चांद्यापासून बांद्यापर्यंत जनावरांच्या अनेक जाती आणि लोकसमूह यांची रेलचेल आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.