Cashew Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Rate : रत्नागिरीत ओल्या काजूगराला किलोला हजार रुपये दर

Cashew Market : चिपळूण, जि. रत्नागिरी येथील बाजारात हजार रुपये किलो दराने ओले काजूगर विकले जात आहेत. सुक्यापेक्षा ओल्या काजूगर विक्रीतून आर्थिक कमाई चांगली होते. मागील महिन्यापेक्षा या महिन्यात काजूगर निम्म्याने कमी झाले आहेत.

Team Agrowon


Cashew : चिपळूण, जि. रत्नागिरी ः येथील बाजारात हजार रुपये किलो दराने ओले काजूगर विकले जात आहेत. सुक्यापेक्षा ओल्या काजूगर विक्रीतून आर्थिक कमाई चांगली होते. मागील महिन्यापेक्षा या महिन्यात काजूगर निम्म्याने कमी झाले आहेत.

परिणामी खवय्यांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. चिपळूणमध्ये येणारे पर्यटकदेखील आवर्जून काजुगर खरेदी करत आहेत.
मागील महिन्यात सुमारे तीनशे रुपये पाव किलो या दराने काजू गराची विक्री सुरू होती. बाराशे रुपये किलो असा दर होता.

मात्र आता काजूगर मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध झाल्यामुळे त्याचे दर उतरलेले आहेत. काजुची ओली बी काढून त्यातील गर काढला जातो. त्याची भाजी केली जाते. ग्रामीण भागातील महिला हा रानमेवा विकायला घेऊन येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काजुची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून या झाडांवर काजू बी मिळत आहे. ग्रामीण भागातील महिला काजुच्या बिया कापून बाजारात विक्री करतात.

शहरातील काही दुकानांमध्ये काजूगर विक्रीला ठेवलेले आहेत. अगदी जून महिन्यापर्यंत ओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरू असतो. काजुच्या बिया विकून महिलांच्या हाती चांगले पैसे देखील मिळतात. पण यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Sugarcane Price: प्रतापगड कारखान्याचा प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर

Wheat Rust Disease: गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Flood Relief: भूम तालुक्यात पूरग्रस्तांना ९० कोटींचे अनुदान वाटप

Loan Recovery Issue: कर्जमाफीची घोषणा; तरीही ऊसबिलातून वसुली सुरूच!

SCROLL FOR NEXT