Satara Agriculture Complex agrowon
ॲग्रो विशेष

Satara Agriculture Complex : पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कृषी संकुल साताऱ्यात, १० हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे उद्दिष्ट

sandeep Shirguppe

Agricultural Complex Satara : Agricultural Complex Satara : सातारा जिल्ह्यातील काळोली येथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकूल उभारण्यात आले आहे. तसेच पाटण नगरपंचायत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन, नवारस्ता-नाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार (ता.३०) करण्यात आले.

यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कृषी संकुल साताऱ्यात उभे राहिले आहे. याठिकाणी दरवर्षी १० हजार शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच विविध वाणांवर संशोधनही करण्याबाबत नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.

यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही उठाव केला त्यावेळी शंभूराजे देसाई माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यात राज्य पहिल्या क्रमांकवर नेले. तसेच सिंधुदुर्ग येथे येणाऱ्या शिव जयंती पूर्वी पुतळा उभा करणार आहे.

"बदलापूर घटनेतील नराधमांला विरोधक फाशी द्या म्हणत होते. ज्यावेळी पोलिसांवर नाराधमाने बंदूक चालवली त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामुळे विरोधक त्याला का मारले म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडू लागले आहेत. अशा दुटप्पी लोकांचा जनता येणाऱ्या निवडणुकीत मत पेटी द्वारे एक्काऊंटर करेल."

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,आदी उपस्थित होते.

असे असेल कृषी संकुल

सातारा जिल्ह्यात शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांची संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षण दिले तर चांगले उत्पन्न मिळेल, या उद्देशाने प्रयत्न साताऱ्यात हे संकुल बांधण्यात आले आहे. एकूण १६ एकर क्षेत्रात याचा विस्तार असणार आहे अशाचप्रकारे पालकमंत्री देसाई यांच्या संकल्पनेतून काळोली येथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशिय कृषी संकुल उभे राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT