Watermelon Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Crop : वातावरणातील बदलामुळे गिरणा परिसरातील टरबूज पीक धोक्यात

Climate Change Crop Damage : सध्या वातावरणात सकाळी पडणारी थंडी व दुपारी बसणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे टरबुजांना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यात या वर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र मुबलक पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यात बहुतांश शेतकऱ्यांनी टरबुजाचे पीक घेतले आहे. मात्र, सध्या वातावरणात सकाळी पडणारी थंडी व दुपारी बसणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे टरबुजांना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेल्या टरबुजांचे नुकसान टाळण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा टरबूज उत्पादकांमधून व्यक्त होत आहे.

गेल्या पाच वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू, हरभरा, मका आणि ज्वारी या रब्बी पिकांनी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन दिले नाही. त्यामुळे गिरणा परिसरातील अनेक गावांमध्ये यंदा यंदा टरबुजांची लागवड झालेली दिसून येत आहे.

गेल्या वर्षी टरबुजांना चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे दोन पैसे हातात जास्त येतील म्हणून उपलब्ध पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी टरबुजांची लागवड केली आहे. लागवडीनंतर फवारणीचा खर्च पेलवणे शक्य नसतानाही बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज काढून या पिकाची चांगल्या प्रकारे जपणूक केली आहे. ज्यामुळे अनेक शेतांमध्ये टरबूजांची चांगली फळे लागली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती उपकरणांचा वापर करुन हे पीक घेतले आहे.

सध्या अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे तसेच सकाळी पडत असलेल्या थंडीमुळे तसेच दुपारच्या कडक उन्हामुळे टरबूज उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत टरबूज पिकांचे आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांना आठवडचातूनच पंप पाठीवर घेऊन कीटकनाशक, पीकवर्धक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे.

सामान्यतः नैसर्गिक वातावरण टरबूजांना पोषक असते. त्यामुळे पंधरा दिवसांतून एकदा फवारणी पुरेशी ठरते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलत्या हवामानामुळे आठवड्याच्या आतच फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत आहे. या संदर्भात कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

टरबुजांंना ८ ते ९ रुपयांचा दर

सद्यःस्थितीत बाजारात टरबुजांना ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा घाऊक भाव बाजारात मिळत आहे. हे बाजारभाव शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले असले तरी सध्याच्या बदलत्या वातावरणात टरबूज पिकांचे जतन करणे शेतकऱ्यांसमोर जणू आव्हान ठरले आहे.

टरबूज पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी टरबूज लागवड क्षेत्र वाढले आहे. काही शेतकऱ्यांशी टरबूज विक्रेत्या घाऊक व्यापाऱ्यांनी आतापासूनच संपर्क करून सौदे करण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी बदलत्या वातावरणाचा विपरित परिणाम टरबुजांवर होणार नाही, यासाठी शेतकरी शर्तीचे प्रयत्न करताना दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Munghantiwar: मुनगंटीवार यांनी विधिमंडळात उपस्थित केलेले शेतीचे प्रश्‍न ठरले लक्षवेधी 

Solar Pump Issues: सोलर पंपाच्या सक्तीने सिंचन अडचणीत

Wild Vegetable Festival: रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; आदिवासी उत्पादनांना ग्राहकांची पसंती

Nanded Rain: नांदेडला पावसामुळे खरिपाला जीवदान

Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद

SCROLL FOR NEXT