Deputy Speaker of the Legislative Assembly Anna Bansode Agrowon
ॲग्रो विशेष

Cow Conservation: गोशाळांना भेटी देऊन महत्त्व समजून घेणार

Anna Bansode Gaushala Visit: देशी गाय संशोधन केंद्रातील देशी गाईची माहिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. गोवंश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. पुढील काळात जेथे जेथे गोवंश शाळा असतील त्या ठिकाणी भेटी देऊन गोशाळेचे महत्त्व समजून घेऊ.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: देशी गाय संशोधन केंद्रातील देशी गाईची माहिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. गोवंश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. पुढील काळात जेथे जेथे गोवंश शाळा असतील त्या ठिकाणी भेटी देऊन गोशाळेचे महत्त्व समजून घेऊ, असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.

पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आयोजित देशी गोवंश जतन व संवर्धन दिन सप्ताहाची सांगता मंगळवारी (ता. २२) झाली. या वेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी

अधिष्ठाता डॉ. महानंद माने आदी उपस्थित होते. या वेळी देशी गाईचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री. भरणे म्हणाले, की मी सुद्धा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे या देशी गाई शेतकऱ्यांसाठी गरजेच्या आहेत. या गाईचे जतन व संवर्धन होण्याची गरज आहे.

ती आनंद देणारी आहे. आज शेती परवडत नाही, असे आपण म्हणतो, पण जो असे म्हणतो, तो शेतीत जात नाही. मात्र, जो शेतीत दररोज जातो, काम करतो, त्यांना ती परवडते. म्हणून पुढील काळात शेती ही महत्त्वाची आहे. २०२९ नंतर शेतीची उंची ही उद्योगाच्या उंचीची होईल, यात शंका नाही.

कार्यक्रमात सूत्रसंचालन डॉ. मृणाल अजोतिकर यांनी केले. तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. माने यांनी आभार मानले गोसंवर्धनात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान जनार्दन चव्हाण, जितेंद्र मुरकुटे, दीपक पत्की, मिलिंद ठोंबरे, रामचंद्र ढेबे, सचिन ताम्हाणे, सुनील हरपुडे, रतन भोसले, यशवंत खैरे, नंदू चौधरी, विठ्ठल जगताप, संदीप बोदगे, राजवीर स्मिता रवींद्र लाड, किरण जाधव, राजेंद्र अथणे, विपुल कृष्णा अष्टेकर, प्रकाश बाफना, मिलिंद कृष्णाजी देवल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्र्यांच्या भवितव्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय?

Lokmanya Tilak Award: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

Sugar Workers Wage: वेतनवाढीमुळे साखर कामगारांना मिळणार ४१९ कोटी रुपयांचा लाभ

FRP Payment: ‘एफआरपी’चे तुकडे केल्यास याद राखा

Monsoon Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

SCROLL FOR NEXT