IAS Jalaj Sharma Agrowon
ॲग्रो विशेष

District Bank Report : प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेचा अहवाल शासनाकडे देऊ

Team Agrowon

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात शेतकरी संघटनांनी १३ महिन्यांपासून आंदोलन सुरूच ठेवले आहे. अखेर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (ता. ६) या आंदोलकांशी चर्चा करीत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाला तत्काळ अहवाल पाठविण्याची ग्वाही दिली.

आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या जिल्हा बँकेने कर्जदारांच्या सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यास प्रारंभ केला आहे. त्याविरोधात शेतकरी संघटनांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर १३ महिन्यांपासून ठिय्या मांडला.

त्याची दखल घेत जिल्हाधिकारी शर्मा यांनी नियोजन सभागृहात बँक, जिल्हा उपनिबंधक व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक दीपक पाटील, कर्जवसुली अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे व बँक कर्मचारी हिरे, शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी

बँकेने सक्तीची वसुली करू नये, अशी सूचना आंदोलकांनी केली. याशिवाय ट्रॅक्टर विक्रीत घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. बँकेच्या चौकशीत गैरकारभार केलेल्या व्यक्तींकडून वसुलीचे आवाहन शेतकऱ्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

Water Pollution : पुणे परिसरातील प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

Kandalwan : अतिसंवेदनशील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच

SCROLL FOR NEXT