Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : दोन मध्यम, लघू प्रकल्पांत जाणवणार टंचाई

Water Crisis : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू, अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांत सद्यःस्थितीत ५४ टक्के (५६८ दलघमी) जलसाठा शिल्लक आहे. यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरेसा जलसाठा मिळणार आहे.

Team Agrowon

Amaravati News : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू, अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांत सद्यःस्थितीत ५४ टक्के (५६८ दलघमी) जलसाठा शिल्लक आहे. यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरेसा जलसाठा मिळणार आहे. या भागांना टंचाईच्या झळा बसणार नसल्या तरी दोन मध्यम व लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील योजनांना मात्र टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघू प्रकल्प आहेत. अप्पर वर्धा धरणात विद्यमान स्थितीत ३२० दलघमी (५६ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून अमरावती शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरवठा करण्यात येतो.

हा जलसाठा उन्हाळ्यात कमी पडणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. यंदा पावसाळ्यात मुबलक व सरासरीने पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली होती. पावसाळ्यातील येवा बघता विसर्ग करावा लागला आहे.

सात मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती सध्या चांगली आहे. एकूण १३७ दलघमी (५३ टक्के) जलसाठा या प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत असून पंढरी व बोर्डीनाला या प्रकल्पातील साठा मे महिन्याच्या मध्यात संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

तर शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या प्रकल्पांतील जलसाठा सध्या सरासरीने उत्तम असला तरी पुढील हंगामात पावसाला विलंब झाल्यास टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता असून पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज आहे. ४८ लघू प्रकल्पांत ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यातील काही प्रकल्पांनी तळ गाठण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील नागरिकांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता अधिक आहे.

पाणीसाठ्याची सद्य:स्थिती

(दलघमी : टक्के)

अप्पर वर्धा ३२० ५६

शहानूर २९ ६४

चंद्रभागा ३१ ७७

पूर्णा २५ ७१

सपन ३३ ८७

पंढरी १४ २५

बोर्डीनाला २.४३ २०

गर्गा ०० ००

४८ लघू प्रकल्प ११० ४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT