
Solapur News : पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील जानेवारी महिन्यातील भूजल पातळीत सरासरी ०.७६ मीटरने वाढ आढळली आहे. तरीही उपलब्ध भूजल साठ्याचा काळजीपूर्वक वापर न केल्यास एप्रिल - मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात १५९ निरीक्षण विहिरी आहेत.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जानेवारी महिन्यात या निरीक्षण विहिरींतील पाणीपातळी नोंदवली आहे. त्यानुसार पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्याची पाच वर्षांतील भूजल पातळीची सरासरी एकूण ५.७८ मीटर आहे. यंदा एकूण ती ५.०१ मीटरने वाढली आहे. एकंदरीत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ०.७६ मीटरने वाढली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी २०२४ मध्ये जून ते डिसेंबर या कालावधीत एकूण ६०५.२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १०७.५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात अनेक मध्यम प्रकल्प, तलाव व कालवे असूनही पडलेल्या पावसाच्या तुलनेत जानेवारीतील भूजल पातळीची स्थिती अपेक्षित नाही. ती पाच वर्षातील सरासरीच्या तुलनेत ०.७६ मीटर म्हणजे २.४० फुटाने वाढली असली तरी वाढते ऊन व पाण्याचा उपसा पाहता ती लवकर खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माढ्याच्या पाणीपातळीत सर्वाधिक वाढ
माढ्यातील भूजल पातळीत सर्वाधिक १.१५ मीटरने वाढ झाली आहे. इतर सर्व तालुक्यातील भूजल पातळीची स्थिती एक मीटरच्याही खाली असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात माळशिरसमधील पातळीत सर्वात कमी ०.५२ मीटरने वाढ झाली आहे.
नियम न ठरल्याने अडचण
सरकारी योजनांतून बोअर घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण वि विकास यंत्रणेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, खासगी बोअरवेलसाठी अशा परवानगीचे कोणतेही नियम नाही. त्यामुळे शेतीसाठी ५०० फुटांपर्यंतही शेतकरी बोअर घेताना दिसतात. उन्हाळ्यात पाणीपातळी घटताच अथवा बोअर बंद पडताच बोअर घेण्याच्या प्रमाणात वाढ होते.
अशा अनियंत्रित खोल बोअर घेण्याबाबत सरकारी पातळीवर अद्याप नियम अंति झाले नाही. त्यामुळे शेतकरी व बोअरवेल गाड्यांवरही कोणतेच नियंत्रण नसल्याने प्रशासनालाही अडचणी येत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.