Maharashtra Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought Condition : राज्यात १८३७ गावे, चार हजार वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; जनावरांचेही हाल

Drought Condition : राज्यात मागच्या वर्षी पाऊस झाला नसल्याने यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Drought : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर राज्यात मागच्या वर्षी पाऊस झाला नसल्याने यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा राज्यातील धरणांमध्येही पाणीसाठी कमी असल्याने मार्चच्यासुरुवातीपासूनच अनेक जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे. तर शेती पिकासाठी पाण्याचा फेर फिरत नसल्याने राज्यातील शेतीचे उत्पादनही घटणार आहे.

राज्यात सध्या १,८३७ हून अधिक गावे आणि ४ हजार ३१८ वाड्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. ग्रामस्थांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्याकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाले आहे.

यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत तब्बल २८ पटींनी वाढ झाली असली, तरी दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे नियोजन करण्यास सरकारला वेळ मिळालेला नाही.

विदर्भ आणि मराठवाड्यात जनावरांच्या चारा आणि पाण्याचे गंभीर संकट उभे राहिल्याने जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात आहेत. दुभत्या जनावरांसह शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या बैलांचे दरही झपाट्याने उतरले आहेत.

राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा ३३.३८ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या पाण्याची मागणी २८ टक्क्यांनी वाढली आहे. राज्य सरकारने ४० तालुके आणि १,१०० हून अधिक मंडलांत दुष्काळ जाहीर केला. मात्र पाण्याची सोय करण्यात सरकारला अपयश आले आहे. सध्या १,८३७ गावे आणि ४,३१८ वाड्यांवर तीन हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT