Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सांगली जिल्ह्यात ७५ टँकरने पाणीपुरवठा सुरू

Water Issue : पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे विभागात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ३५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याचा पाण्यावर सुद्धा झाला आहे. जुलै अखेरीस तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला असून, सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे पाणी पातळी वाढली नसल्याने अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १५१ टँकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ९२, तर सांगली जिल्ह्यात ७५ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

गेल्या वर्षी याच काळात पुणे विभागात २७० गावे आणि १५५६ वाड्यावस्त्यांवर ३३० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होऊन होता. पुणे जिल्ह्यातील ३८ गावे ३५० वाड्यावस्त्यांवर ७० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सातारा जिल्ह्यात १४० गावे, ५३० वाड्यावस्त्यांवर १४८ टँकर, सांगलीत ७३ गावे, ५२९ वाड्यावस्त्यांवर ७५ टँकर, सोलापुरात १९ गावे,

१४७ वाड्यावस्त्यांवर ३७ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तर कोल्हापूर जिल्ह्यात एकही टँकर सुरू झालेला नव्हता. त्यानंतर मे महिन्यात या संख्येत आणखी वाढ झाली होती. परंतु पावसाळ्यात ही संख्या काही प्रमाणात कमी झाली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने टँकरच्या संख्येत वाढ होत आहे.

विभागातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात ऐन पावसाळ्यात टँकर सुरू ठेवण्याची वेळ सरकारवर आली होती. या तालुक्यात जानेवारीपासून आणखी संख्या वाढली आहे. परंतु पुढील महिन्यात पाण्याचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे. सध्या पुणे विभागात ३१५ गावे व १७१२ वाड्यावस्त्यांवर ३५६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी ३२ टँकर, तर खासगी ३२४ टँकरचा समावेश आहे.

पुणे विभागातील टँकरची स्थिती

जिल्हा गावे वाड्यावस्त्या टँकर संख्या

पुणे ६२ ४४८ ९२

सातारा १४६ ५३१ १५१

सांगली ७३ ५२९ ७५

सोलापूर ३४ २०४ ३८

एकूण ३१५ १७१२ ३५६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT