
Water Scarsity : जळकोट, जि. लातूर : तालुक्यातील १४ पैकी ८ साठवण तलावांतील जलसाठा जोत्याखाली गेला आहे. इतर पाणीसाठ्यांची स्थितीही गंभीर आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची धग वाढत चालली आहे.
एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. बारमाही विहिरींसह साठवण तलावांतील जलसाठा तळाला गेला आहे. तालुक्यात पाऊस जेमतेम झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यात लहान-मोठे असे १४ साठवण तलाव आहेत. मार्चपासूनच काही प्रकल्प तळ गाठत आहेत. त्यामुळे येत्या ऑगस्टपर्यंत दिवस कसे काढायचे, हा खरा प्रश्न आहे.
तालुक्यात सोनवळा, हळदवाढवणा, जंगमवाडी, केकतसिंदगी, ढोरसांगवी, चेरा, हावरगा या तलावांत आता मृतजलसाठा असल्याचे सहायक अभियंता अरुण त्रिपाठी यांनी सांगितले.
अनेक गावातील बहुतांश हातपंप पाणीपातळी घसरल्याने बंद पडले आहेत. पाणीटंचाई लक्षात घेता अनेकदा सूचना देऊनही साठवण तलावातून पाणीउपसा सुरू आहे. महावितरण, पोलिस, महसूल व पंचायत समिती यांच्या संयुक्त पथकाची नियुक्ती केली असून, वायर व वीजपंप जप्त करण्याची कारवाई करणे सुरू असल्याचे तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी कळविले.
धरणातील पाणीसाठा पूर्णपणे राखीव ठेवला आहे. अनधिकृत पाणीउपसा केल्यास पाणीटंचाईची समस्या तीव्र होईल. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध साठवण तलावांवरील पाणीउपसा बंद करण्याचे आदेश दिले असून, २७ मार्चला सोनवळा साठवण तलावावरील वीजपुरवठा बंद करुन साहित्य जप्त करण्याची कारवाई पथकाने केली. यात ७ स्टार्टर बॉक्स, १० वायर बंडल हे साहित्य जप्त केल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली.
साठवण तलाव-जलसाठा स्थिती
सोनवळा-जोत्याखाली
हळद वाढवना-जोत्याखाली
जंगमवाडी-जोत्याखाली
डोंगरगाव-४७ टक्के
माळहिप्परगा-५१ टक्के
रावणकोळा-३१ टक्के
केकतसिंदगी-जोत्याखाली
ढोरसांगवी-जोत्याखाली
चेरा तलाव क्र. १-जोत्याखाली
चेरा तलाव क्र. २- जोत्याखाली
हावरगा लघू सिंचन तलाव-जोत्याखाली
धोंडवाडी- ८.९४ टक्के
गुत्ती तलाव क्र.१-१२.६२ टक्के
गुत्ती तलाव क्र.२-९ टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.