Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर

Reservoir Level : मोठ्या प्रकल्पातील ९० टक्के, असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यासह मध्यम प्रकल्पातील ७८ टक्के,लघु प्रकल्पातील ६७ टक्के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधील ७५ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना, नदीवरील बंधाऱ्यांमधील ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ८३ टक्क्यांवर आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पातील ९० टक्के, असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यासह मध्यम प्रकल्पातील ७८ टक्के,लघु प्रकल्पातील ६७ टक्के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधील ७५ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना, नदीवरील बंधाऱ्यांमधील ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी प्रकल्पात ९३ टक्के ,येलदरीत ९५ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ७९ टक्के, माजलगावमध्ये ७५ टक्के, मांजरामध्ये ९४ टक्के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ९२ टक्के, निम्न तेरणामध्ये ९८ टक्के, निम्न मनारमध्ये ८६ टक्के, विष्णुपरीत ८८ टक्के, निम्न दुधनामध्ये ६७ टक्के तर सीना कोळेगाव प्रकल्पात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

७५ मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ प्रकल्पात ६७ टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पात ६३ टक्के,बीडमधील १६ प्रकल्पात ९० टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पात ७५ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पातील ७९ टक्के, नांदेड मधील नऊ प्रकल्पात ८७ टक्के ,परभणीतील दोन प्रकल्पात ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात कमी पाणीसाठा

मराठवाड्यातील ७५१ लघु प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वात कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघु प्रकल्पात सर्वात कमी ५३ टक्के तर जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

त्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यातील २०६ लघु प्रकल्पात ६२ टक्के ,हिंगोलीतील २७ प्रकल्पात ६४ टक्के,परभणीतील २२ प्रकल्पात ६७ टक्के ,बीडमधील १२६ प्रकल्पात ७१ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ७६ टक्के तर लातूर जिल्ह्यातील १३५ लघु प्रकल्पात सर्वाधिक सरासरी ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

दहा लघु प्रकल्प जोत्याखाली

मराठवाड्यातील जालन्यातील दोन बीड व लातूर मधील प्रत्येकी एक व धाराशीवमधील सहा मिळून दहा लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही जोत्याखाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

पाणीसाठा स्थिती... तीन मध्यम प्रकल्पात २५ टक्केपेक्षा कमी पाणी ६७ लघु प्रकल्पातही २५ टक्केपेक्षा कमी पाणी ८६ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान पाणीसाठा ८६ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान पाणीसाठा ४३४ लघु प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणी ६ मध्यम प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान पाणीसाठा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT