Water Storage : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ८५ टक्क्यांवर

Marathwada Water Stock : मराठवाड्यातील एकूण ८७९ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ८५.८९ टक्क्यांवर आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ८७९ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ८५.८९ टक्क्यांवर आहे. त्यामध्ये ७५ माध्यमातून ८० टक्के उपयुक्त पाण्यासाठ्यासह ११ मोठ्या प्रकल्पातील ९२.६५ टक्के तर ७५१ लघु प्रकल्पातील ७० टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ७७ टक्के तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा सामावेश आहे.

मराठवाड्यातील ७५१ लघु प्रकल्पांपैकी दहा प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये जालन्यातील दोन ,बीड व लातूरमधील प्रत्येक एक तर धाराशिवमधील ६ प्रकल्पाचा समावेश आहे. ७५१ लघु प्रकल्पापैकी छत्रपती संभाजीनगरमधील ९८ लघु प्रकल्पात ५४ टक्के, जालनामधील ५७ प्रकल्पात ६३ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ७४ टक्के, लातूर मधील १३५ प्रकल्पात ८३ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ६३ टक्के, नांदेड मधील ८० प्रकल्पात ७९ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पात ७२ टक्के, हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पात ६६ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

Water Storage
Ground Water Storage : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये १.४१ मीटरने वाढ

७५ माध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पात ६८ टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पात ६५ टक्के,बीडमध्ये १६ प्रकल्पात ९२ टक्के ,लातूरमधील ८ प्रकल्पात ७८ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात ८० टक्के, नांदेडमध्ये ९ प्रकल्पात ९० टक्के तर परभणीमधील २ प्रकल्पात ८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मोठ्या ११ प्रकल्पापैकी जायकवाडी ९५ टक्के, येलदरीमध्ये ९७ टक्के, सिद्धेश्वर मध्ये ६८ टक्के, माजलगाव मध्ये ७८ टक्के, मांजरामध्ये ९६ टक्के, ऊर्ध्व पेनगंगामध्ये ९५ टक्के, निम्न तेरणामध्ये १०० टक्के, निम्न मनारमध्ये ८७ टक्के, विष्णुपुरीमध्ये ९२ टक्के, निम्न दुधनामध्ये ६९ टक्के तर सीना कोळेगाव मध्ये ९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

Water Storage
Water Storage : सिंचनामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वेगाने घट

११ लघु, मध्यम प्रकल्प जोत्याखाली...

मराठवाड्यातील ७८ मध्यम प्रकल्पांपैकी एक तर ७५१ लघु प्रकल्पांपैकी दहा प्रकल्पामधील पाणीसाठा जोत्याखालीच आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या दहा लघुकल्पांमध्ये जालन्यातील २, बीड व लातूरमधील प्रत्येकी एक तर धाराशिवमधील ६ प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या एकमेव प्रकल्पांमध्ये जालन्यातील प्रकल्पाचा समावेश आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगरमधील २ व धाराशिवमधील २ अशा ४ प्रकल्पांमध्ये २५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. लघु प्रकल्पांपैकी ६४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर व धाराशिवमधील प्रत्येकी २२, जालन्यातील ९, बीडमधील ८, लातूर, हिंगोली व नांदेडमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com