Water Crisis
Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : खानदेशात जलसाठा घटू लागला

Team Agrowon

Jalgoan News : खानदेशात यंदा ४० टक्क्यांपेक्षा कमी एकूण जलसाठा आहे. त्यात पाण्याचा उपयोग, मागणी ऑक्टोबरमध्ये वाढली. उष्णताही होती. यामुळे जलसाठा घटत असून, सप्टेंबरच्या तुलनेत हा जलसाठा तीन टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे. यातच प्रमुख प्रकल्पांत जलसंचयही कमी आहे. यामुळे अडचणी अधिक आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाच्या चाळीसगाव नजीकच्या गिरणा धरणातील जलसाठा सप्टेंबरच्या मध्यात ५७ टक्के होता. तो आता ५६ टक्क्यांखाली आला आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. परंतु हे धरण ६० टक्के न भरल्याने गिरणा पट्ट्यात टंचाईचे संकट असणार आहे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

धुळे जिल्ह्यातील कमाल प्रकल्प रिकामे आहेत. फक्त पांझरा व अनेर प्रकल्प १०० टक्के भरले होते. मालनगाव, अमरावती, सोनवद, बुराई प्रकल्पांत ठणठणात आहे. नंदुरबारातील सुसरी प्रकल्पातही जलसाठा कमी झाला आहे. दरा व देहली प्रकल्पांतील जलसाठा ९० टक्क्यांवर आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या जामनेरातील तोंडापूर, वाघूर, रावेरातील सुकी, भुसावळातील हतनूर, अभोडा, मंगरूळ, यावलमधील मोर, गारबर्डी या प्रकल्पांतील जलसाठा ९० टक्क्यांवर आहे.

परंतु पश्‍चिम भागातील मन्याड, भोकरबारी, अग्नावती, बहुळा या प्रकल्पांत ठणठणाट आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा भागात जलसंटक अधिक आहे. गिरणा धरणातून यंदा रब्बीसाठी पाणी देण्यासंबंधी निर्णय झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या धरणाचे पाणी उद्योग व पिण्यासाठी राखीव करण्यात आले आहे.

वाघूर व हतनूरमधून शेतीला पाणी

जामनेरातील वाघूर नदीवरील वाघूर धरण आणि तापी नदीवरील भुसावळ नजीकच्या हतनूर धरणातून रब्बीसाठी पाणी दिले जाणार आहे. त्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे. हतनूरच्या मदतीने रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील मिळून सुमारे सात ते साडेसात हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होईल. तर वाघूरमधून भुसावळ व जळगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होईल, अशी माहिती मिळाली.

पांझरातून नदीत पाणी सोडा

पांझरा धरण साक्री व धुळे तालुक्यांलगत आहे. या नदीचा लाभ धुळे, साक्री, शिंदखेडा व जळगावमधील अमळनेरलाही हतो. नदीकाठी टंचाई तयार होईल. त्यापूर्वीच नदीत पाणी सोडले जावे. यामुळे नदीमधील सार्वजनिक पाणी योजनांच्या जलसाठ्यांचे पुनर्भरण होईल व टंचाईची तीव्रता पुढे कमी राहील, असाही मुद्दा शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : तेजीनंतर आता तुरीचा बाजार दबावात

Raw Mango : लोणच्याच्या कैऱ्यांची आर्णी बाजारात आवक

Onion Market : नगर जिल्ह्यात कांदादर ३१०० ते ३२०० रुपयांवर स्थिर

HTBT Cotton : सविनय कायदेभंग करीत ‘एचटीबीटी’ची लागवड

Ginger Market : आले पिकाच्या दरात सात ते आठ हजारांनी घट

SCROLL FOR NEXT