Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा २७ टक्क्यांवर

Irrigation Project Water Issue : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा घटत असून, हा साठा सुमारे २७ टक्के एवढाच राहिला आहे. गिरणा धरणातील साठा १४ टक्के एवढाच आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा घटत असून, हा साठा सुमारे २७ टक्के एवढाच राहिला आहे. गिरणा धरणातील साठा १४ टक्के एवढाच आहे. जलसाठा घटत असल्याने पुढे चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. भुसावळ (जि.जळगाव) येथील तापी नदीवरील हतनूर धरणासह गिरणा, वाघूर प्रकल्पातील जलसाठाही चिंताजनक स्थितीत आहे.

काही दिवसांपूर्वी तापी नदीला चांगले प्रवाही पाणी हतनूरमधून पाणी नदीत सोडल्याने आले होते. यामुळे टंचाई दूर झाली आहे. तसेच गिरणा नदीवरील गिरणा धरणातील साठा घटून १४ टक्के एवढा झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी या धरणातून पाणी सोडले जाते. तसेच रब्बीत २१ हजार हेक्टरला लाभ मिळतो. या धरणातून तीनदा नदीत पाणी सोडले आहे. धरणाची साठवण क्षमता १८ टक्के एवढी आहे. हे धरण गेले दोन वर्षे १०० टक्के भरले आहे. यामुळे धरणातील पाण्याचा चांगला लाभ गिरणा काठच्या गावांना झाला आहे.

हतनूर (ता.भुसावळ) धरणातील जलसाठा धरणात यंदा जलसाठा १०० टक्के होता. त्यातून रब्बीला तीन वेळेस पाणी देण्यात आले. दीपनगर (ता.भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता.भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या सुमारे १० गावांमधील टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाते.

या धरणात ५४ टक्के गाळ असल्याने जलसाठा झपाट्याने घटला आहे. हतनूरमधून तीनदा रब्बीसाठी आवर्तन सुटले होते. तसेच जामनेरातील वाघूर धरणाची साठवण क्षमता आठ टीएमसी आहे. यातही सुमारे ४५ टक्के जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुळा, अंजनी, तोंडापूर, अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, गूळ या धरणांतील साठाही मिळून ३० टक्क्यांखाली आहे. धुळ्यातील अनेर, पांझरा, अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पांतील साठाही २५ टक्के असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT