Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : नांदेडमध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने घट

Water Storage Decline : सध्या उन्हाचे चटके वाढल्याने जिल्ह्याच्या प्रकल्पातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे.

Team Agrowon

Nanded News : सध्या उन्हाचे चटके वाढल्याने जिल्ह्याच्या प्रकल्पातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटीवेअरसह उच्च पातळी बंधाऱ्यात सध्या २९९.३६ दशलक्ष घनमीटरनुसार ४१.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

मागील वर्षी पावसाळ्यातील पाच महिन्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. यामुळे नांदेड पाटबंधारे विभागाने रब्बी तसेच उन्हाळी पाणी पाळ्यांचे नियोजन करून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. तसेच मागील एक महिन्यापासून तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचे चटके बसत आहेत.

यामुळे सध्या पाणी पातळीत घट होत आहे. सध्या २९९.३६ दशलक्ष घणमीटरनुसार ४१.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ५२.५६ टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ४७.०७ टक्के पाणीसाठा आहे.

यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ४३.२५ टक्के, चार कोल्हापुरी बंधाऱ्यात ०.१३ टक्के, ८८ लघू प्रकल्पात २९.२९ टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ४१.०५ टक्के असा एकूण २९९.३६ दशलक्ष घणमीटरनुसार ४१.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ५३७.८० दलघमीनुसार ४४.४१ टक्के व सिद्धेश्‍वर प्रकल्पात ४२.१७ दलघमीनुसार ५२.४५ टक्के तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ६०४.०० दलघमीनुसार ६२.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ५३७.८० ६६.४१

सिद्धेश्‍वर ४२.१७ ५२.४५

इसापूर ६०४.०० ६२.६५

प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी ३८.०३ ४७.०७

मानार ७२.६४ ५२.५६

मध्यम प्रकल्प (९) ६०.१५ ४३.२५

लघू प्रकल्प (८८) ५०.६२ २९.२९

उच्चपातळी बंधारे (९) ७७.९१ ४१.०५

कोपबंधारे चार (चार) ०.०१ ०.१३

एकूण प्रकल्प ११२ २९९.३६ ४१.११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Cycle Process: जलशास्त्र : पाण्याच्या प्रवासाचे विज्ञान

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT