Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : जायकवाडीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार?

Parli Thermal Power Station : यंदा उन्हाच्या झळा आणि धरणातील पाणी पातळी घटल्याने जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या वर्षी राज्यात पावसाळ्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे विविध जिल्ह्यात दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर धरणांवर असणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्रांवर वीजनिर्मितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच प्रश्न परळी येथील औष्णिक केंद्रातून वीज निर्मिती केंद्रात निर्माण झाल्याने जायकवाडी धरणातून सोमवारी (ता. १८) सायंकाळी  पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या पाणी सोडले जात असून वीज निर्मितीसह जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

परळी औष्णिक केंद्र

परळी येथील औष्णिक केंद्रातून वीज निर्मिती केली जाते. मात्र मार्च महिन्याच्या मध्यातच खडका बंधाऱ्यातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्रातून होणारी वीजनिर्मिती कधीही बंद पडू शकते.

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले

यामुळे जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोमवारी सायंकाळी १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून याचा वेग वाढवला जाईल अशी अशी माहिती जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे. तसेच जाधव यांनी, १ एप्रिलपर्यंत परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी खडका बंधाऱ्यात जवळजवळ २० दलघमी पाणी दिले जाईल, असे ही म्हटले आहे. 

धरणाची पाणी पातळी 

परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीजनिर्मितीसाठी सोमवारी सायंकाळी १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे  जायकवाडी धरणात सोमवारी पाणी पातळी २३.९८ टक्क्यांवर नोंदवली गेली आहे. 

उजव्या कालव्यालाही मिळणार पाणी

सध्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीजनिर्मितीसाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी दिले जात आहे. हे पाणी रोटेशन नुसार सुरू राहणार आहे. दरम्यान लवकरच उजव्या कालव्याबाबत देखील नियोजन होणार असून एप्रिलमध्येच पाणी सोडले जाणाच्या शक्यता आहे. यामुळे ऐन दुष्काळात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT