Parbhani News : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व घरांना पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाख ५६ हजार घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित नळ जोडण्या जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
महाराष्ट्र दिनानिमित्त येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडिअमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते पार पाडले. या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदींसह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाल्या, की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मागील दोन वर्षांत ६ हजार शेतकऱ्यांना १२ कोटी अनुदान अदा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी अखंडित वीजपुरठ्याकरिता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. दूधगाव (ता. जिंतूर) येथील चार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पामुळे दूधगाव, आसेगाव, कौडगाव येथील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी सुरळीतपणे वीजपुरवठा मिळत आहे.
आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण...
आर. आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार अंतर्गत जिल्हा पुरस्कार ब्राह्मणगाव (ता. परभणी) व सिरसम (ता. गंगाखेड) यांना संयुक्तरीत्या तर तालुका पुरस्कार ब्राह्मणगाव (ता. परभणी), अंबरवाडी (ता.जिंतूर), काजळी रोहिणा (ता. सेलू), पाळोदी (ता. मानवत), हदगाव खुर्द (ता. पाथरी), लासीना (ता. सोनपेठ), सिरसम (ता. गंगाखेड), तेलजापूर (ता. पालम), महागाव (पूर्णा) या गावांना सन्मानित करण्यात आले.
आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्काराने बालकिशन भोसले यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण विभागाकडून वसुंधरा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पूर्वा गायकवाड (प्रथम), समीक्षा ढेंबरे (द्वितीय), स्वराली देशपांडे (तृत्तीय) या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.