Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : यवतमाळ जिल्ह्यातील तीन गावांत टँकरने पाणीपुरवठा

Tanker Water Supply : दर वर्षी संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. यावर उपाय योजना म्हणून विहीर अधिग्रहण, टँकर लावण्यात येते.

Team Agrowon

Yavatmal News : वाढत्या उन्हाच्या झळा असह्य होत असताना आता पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील तीन गावांत सध्या टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. दर वर्षी संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. यावर उपाय योजना म्हणून विहीर अधिग्रहण, टँकर लावण्यात येते.

यंदा चार कोटी ६१ लाख रुपयांचा पाणीटंचाईचा कृती आराखडा आहे. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत ३४९ खासगी विहीर अधिग्रहण, तर जवळपास १७ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहे. अशात जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

नदी, नाले, विहीर, बोअर पूर्णत: कोरडे पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे. यात पुसद तालुक्यातील बुटी ई, वडसद, रामपूर ई ह्या तीन गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे टँकर तसेच खासगी विहीर अधिग्रहण प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार तीन टँकर गावात चालू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावाच्या परिसरातील तीन खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

येत्या काळात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर पाण्याची पातळी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकर तसेच खासगी विहीर अधिग्रहणाची संख्यासुद्धा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जलजीवनच्या कामांचा उडाला बोजवारा

जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून सोळाशेहून अधिक कामे चालू आहे. या कामाकरिता केंद्र शासनाने कोट्यवधी रुपये उपलब्ध करून दिले होते. सुरवातीला अतिशय गतीमान पद्धतीने कामे पार पडली. त्यानंतर अनियमित निधी उपलब्धतेमुळे कामांना ब्रेक लागला आहे. सध्या दोनशे कोटीहून अधिकचे देयके पाणी पुरवठा विभागात पडून आहे. ठप्प पडलेल्या कामांमुळे जलजीवन मिशनच्या कामांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

4पुसद तालुक्यातील बुटी ई, वडसद, रामपूर (ई) या तीन गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . विशेष म्हणजे या तिन्ही गावात विहीर अधिग्रहणसुद्धा करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत टँकर तसेच विहीर अधिग्रहणाची संख्यासुद्धा वाढण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT