
Palghar News : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तीन धरणांचा पाणीसाठा हा खालावत चालला आहे. दोन महिन्यांपूर्वीच सूर्या धरणाच्या सरासरी क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा २७ टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात वसई-विरार शहरात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसई-विरार शहराला सूर्या धामणी, पेल्हार आणि उसगाव या तीन धरणांतून पाण्याचे नियोजन केले जाते. लोकसंख्या पाऊण कोटीच्या घरात गेल्याने त्यामानाने पाण्याची गरजदेखील वाढू लागली आहे. महापालिकेकडून नवीन गृहसंकुलांना नळजोडणी देण्याची कार्यवाहीदेखील केली जात आहे. त्यामुळे पाण्याची मागणी अधिक होणार आहे. अशातच नव्याने अमृत टप्पा दोन या पाणीपुवरठा योजनेचे काम शहरात व गावात सुरू आहे.
जलकुंभ, मुख्य व अंतर्गत जलवाहिनी अंथरण्यात येत आहे. त्यामुळे चाचणी करून पाणी वितरित केले जाणार आहे; मात्र पाणीपुरवठा करताना प्रशासनासमोर पाणीसाठ्याचे आव्हान असणार आहे.
सूर्या धामणी धरणात डिसेंबर महिन्यात ९३.९० टक्के इतका साठा होता; मात्र फेब्रुवारीपर्यंत २७ .२२ टक्क्यांनी खालावला आहे, तर उसगाव धरणातील पाणीसाठा हा ९६.३० व ९९.१० इतका होता; मात्र अनुक्रमे २४. ४९ व ३८.४३ टक्के इतकी पाण्याची पातळी कमी झाली आहे.
वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने देहरजी, खोलसा पाडा पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. जर या योजनेचे काम लवकर पूर्ण झाले, तर जलदिलासा मिळू शकतो.
सद्यःस्थितीत उकाड्याला सुरुवात झाली असून, पाण्याचा वापर वाढत आहे. त्यातच अद्याप मार्च, एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची नितांत गरज निर्माण होणार आहे. अशातच धरणातील पाण्याची पातळी अशीच खालावत राहिली, तर जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते.
...तर टॅंकरचा आधार
ज्या गावांमध्ये विहिरी, बोअरवेलने नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. त्या गावातील विहिरी, बोअरवेल आटल्या, तर वसई-विरार महापालिकेला टँकरने पाणीपुवठा करावा लागणार आहे. येत्या तीन महिन्यांत पाण्याची झळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
धरणातील पाणीसाठा
धामणी धरण क्षमता २७६.३५ दशलक्ष लिटर
उपयुक्त पाणीसाठा १८३.७३० दशलक्ष लिटर
उसगाव ४.९६ दशलक्ष लिटर
पाणीसाठा ३.५६२
पेल्हार ३.५६ दशलक्ष लिटर
पाणीसाठा २.१६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.