Grape Orchards Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Challenges : कडवंची परिसरात द्राक्ष बागायतदारांसमोर पाण्याचा प्रश्‍न

Water Scarcity : जालना जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळखल्या जात असलेल्या कडवंची परिसरातील द्राक्ष बागायतदारांसमोर यंदा बागा जगविण्यासाठी पाण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : जालना जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळखल्या जात असलेल्या कडवंची परिसरातील द्राक्ष बागायतदारांसमोर यंदा बागा जगविण्यासाठी पाण्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. स्थिती अनुकूल असली, तरी पाण्याअभावी यंदा अनेकांनी बागा सोडून देणेच पसंत केल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

जालना जिल्ह्यातील कडवंची नंदापूर धारकल्याण पीरकल्याण आदी दहा ते बारा गावांत कमी-अधिक प्रमाणात द्राक्ष शेती गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. कडवंचीने तर शेततळ्याच्या पाण्यावर द्राक्ष शेतीचे मॉडेलच उभे केले. परंतु यंदा हवामान अनुकूल असले, तरी एकूण बागांपैकी ५० टक्केच बागा उत्पादन देतील अशी स्थिती असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

नंदापूर गावशिवारात सुमारे साडेतीनशे ते साडेचारशे एकर द्राक्ष बागा होत्या. तिथे यंदा मुश्किलीने ९० एकर बागाच शिल्लक असल्याची माहिती माजी सरपंच दत्तू चव्हाण यांनी दिली. त्यातही यंदाचा हंगाम कसाबसा काढून २५ ते ३० टक्के बागा त्यामधूनही कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. गतवर्षीच्या पावसाळ्यात आमच्या नंदापूर शिवारात ३५० मिलिमीटर पाऊस झाला होता.

यंदा पडलेला पाऊस ३७६ मिलिमीटर इतका असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. कडवंचीचे माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर म्हणाले, की विदर्भातील बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या भागापासून बदनापूरपर्यंत सुमारे पन्नासएक गावांत यंदा संपूर्ण पावसाळ्यात पाऊसच कमी पडला. परंतु जालना जिल्ह्यात काही भागांत झालेल्या जोरदार पावसाने आमच्याकडील कमी पावसाचा विषय दबला गेला.

‘कुज’चे संकट

यंदा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत शेतकऱ्यांनी छाटण्या केल्या. मध्यंतरी अवेळी आलेल्या थोड्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे घड कुजचे संकट आल्याचे कडवंची येथील द्राक्ष उत्पादक रवींद्र क्षीरसागर म्हणाले. वीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांना शेततळ्यात पाणी घेता आल्याचे ते म्हणाले. कडवंची परिसरातील काही बागा फुलोऱ्यात, काही पाणी उतरण्याच्या स्थितीत, काही नुकत्याच फुटण्याच्या स्थितीत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.

१८ एकरांपर्यंत द्राक्ष शेती करायचो. यंदा केवळ सहा एकर बाग उत्पादनासाठी छाटली होती. त्यातही एक एकर पुन्हा पाण्याच्या उपलब्धतेअभावी सोडून दिली. ज्या बागेत उत्पादन घेतो, तिलाही उपलब्ध पाणी पुरेल की नाही हा प्रश्‍न आहे.
दत्तात्रय चव्हाण, माजी सरपंच तथा द्राक्ष उत्पादक, नंदापूर
गत वर्षी पाणी कमी पडल्याने जालन्यातून विकत आणून बागेला टाकले. दीड लाख खर्चातून ८० हजार पदरात पडले. यंदा पाणीच उपलब्ध नसल्याने बाग सोडून दिली.
पुंजाराम शेळके, कडवंची
सुमारे १२ एकर द्राक्ष बाग आहे. तिला कसेबसे पाणी पुरेल. आमच्या परिसरात पाण्याचे संकट मोठे आहे. अनेकांच्या शेततळ्यात पाणीच नाही.
चंद्रकांत क्षीरसागर, माजी सरपंच तथा द्राक्ष उत्पादक, कडवंची

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT